नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या macaish.com या वेबसाईट वर.
100 Synonyms Words in Marathi: पोलीस भरती, SRPF (राज्य राखीव पोलीस दल), तलाठी भरती, वनरक्षक भरती किंवा कोणतीही सरळ सेवा असो, त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे, कारण मराठी व्याकरण हा घटक आपणास 20 ते 25 प्रश्नांसाठी विचारला जात आहे.
मराठी व्याकरणांमध्ये जवळपास दहा ते पंधरा महत्त्वाचे उपघटक असतात ज्यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सर्वात सोपे काही घटक असतात जसे की प्रयोग, वाक्प्रचार, म्हणी,समानार्थी शब्द,विरुद्धार्थी शब्द असे काही महत्त्वाचे घटक असतात.
तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले 100 महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी शब्द या घटकावर ती 1 ते 2 प्रश्न हे नेहमीच विचारले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे 100 समानार्थी शब्द जे आहेत त्यापैकीच आपल्याला परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात.
तसेच समानार्थी शब्द आणि परीक्षेमध्ये कशा पद्धतीने त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. अधिक माहिती पाहिजे असल्यास किंवा 100 समानार्थी शब्दांची PDF हवी असल्यास Macaish या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
200 महत्त्वाचे समानार्थी शब्द :
अग्नी – आनंद, विस्तव, आग, पावक, अंगार, वन्ही
अंबर – वस्त्र, आकाश, गगन, आभाळ, अवकाश, अंतरिक्ष, व्योम
कमळ – सरोज, राजीव, पुष्कर, पंकज, उत्पल, पद्म
चंद्र – शशी, इंदू, सुधांशू, सुधाकर, हिमांशू, तारापती
स्त्री – रमा, महिला, अबला, वनिता, कामिनी, अंगना
सूर्य – सविता, भानू, भास्कर, आदित्य, मित्र दिनकर, मार्तंड
सिंह – केसरी, वनराज, पंचानन, मृगराज, शार्दुल
शरीर – देह, काया, तनु, अंग, वपू, कुडी, कायापूर
पृथ्वी – धरा, रसा, मही, क्षिती, क्षमा, वसुंधरा धरणी, भूमी, धरत्री, वसुधा
समुद्र – दर्या, सिंधू, जलधी, पयोधी, वाडीरात्री, अर्णव, रत्नाकर, पयोधर
राजा – भूप, राणा, नृप, राया, भूपती, भूपाल, नरेश, सम्राट, प्रजापती, नृपती, नरेंद्र, पृथ्विपती, लोकपाल
पाणी – जल, तोय, पय, अंबु, सलील, जीवन, वारी, उदक
वीज – विद्युत, बिजली, तडीत, विद्युलता, चपला, सौदामिनी
तलाव – जलाशय, तटाक, तडाग, कासार, कांतर, सरोवर, तळे, सारस
दुःख – पिडा, व्यथा, खेद, वेदना, शोक, क्लेश, क्षोभ, यातना
दरिद्री – गरीब, दीन, खंक, रंक, कंगाल, निर्धन
तरबेज – वाकबगार, निष्णात, पारंगत, कुशल
द्रव्य – संपत्ती, दौलत, ऐश्वर्य, पैका, धन, अर्थ, पैसा
प्रवीण – चतुर, कुशल, तरबेज, निपुण, हुशार, पारंगत, पटू
विष्णू – रमेश, वासुदेव, माधव, श्रीपती, अच्युत, रमापती, गोविंद, चक्रपाणी, पुरुषोत्तम, मधुसूदन, पितांबर, केशव, त्रिविक्रम, ऋषिकेश
राग – द्वेष, क्षोभ, कोप, त्वेष, क्रोध, संताप, चीड, मत्सर
राणी – महिषी, महाराज्ञी, राज्ञी, सम्राज्ञी, महाराणी, राजराणी
व्यवस्था – योजना, तजवीज, तयारी, प्रबंध
साधू – बैरागी, मुनी, संत, ऋषी, तपस्वी
सरस्वती – भारती, वागिश्वरी, वीणावादिनी, शारदा, श्वेतवाहिनी, ब्राम्ही, वाणी, हंसवाहिणी, सावित्री
शंकर – महेश्वर, महादेव, शिव, महेश, गौतम, चंद्रशेखर, पार्वती, त्र्यंबक, सांब, रुद्र, नीलकंठ कैलासनाथ, त्रिनेत्र, भालचंद्र
भुंगा – मधुप, अली, द्विरेफ, भ्रमर, मधुकर, भृंग, मिलिंद
असंख्य – अपार, अमर्याद, अमित, बहुत, अगणित, पुष्कळ, बहु
कन्या – सुता, नंदिनी, मुलगी, आत्मजा पुत्री, तनया, दुहिता, तनुजा
किंमत – भाव, दर, मोल, मूल्य
जग – भुलोक, जगत, दुनिया, विश्व, मृत्युलोक, भुवन
अरण्य – वन, जंगल, कानन, अटवी, विपिन
ढग – अंबुद, मेघ, घन, पयोद, जलद
तरबेज – निष्णात, पारंगत, वाकबगार, कुशल
गरुड – खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर, वैनतेन
जलद – ताबडतोब ,मेघ, शीघ्र, अब्रू, पमोधर, लवकर
थवा – चमू, गट, जमाव, घोळका, समुदाय, गर्दी
भांडण – कज्जा, तंटा, झगडा, कलह
रात्र – रजनी, यामिनी, निशा, विभावरी, रात
लढाई – युद्ध, रण, संग्राम, समर, झुंज, संगर
हट्टी – आग्रही, आक्रस्ताळ
सर्प – भुजंग, साप, अही, भुजंगम, व्याल, उरग
हरीण – सारंग, मृग, कुरग, कुरंग, काळवीट कुरंगम
नदी – तरिनी, नद, जलवाहिनी, तरंगिणी, जीवनदायी, सरिता, तरिणी
पत्नी – कांता, भार्या, दारा, कलत्र, बायको, गेहिनी, अर्धांगिनी, सहधर्मचारिणी, वामांगी
वारा – वायू, वात, अनिल, समीर, मरुत, पवन, समिरण
शक्ती – देह, काया, तनु, अंग, वपु, कुडी, कायापुर
शीघ्र – जलद, ताबडतोब, झटपट, लवकर, द्रुत
धनुष्य – कोदंड, धनु, कामटा, कार्मुक
नवरा – पती, वल्लभ, धनी, भर्तार, कांत
अश्व – घोडा, वारू, तुरंग, हय, वाजी, अस्प
क्रीडा – विहार, खेळ, मनोरंजन, मौज, लीला
इच्छा – आर्जू, स्पृहा, लीप्सा, आकांक्षा
कृपण – चिक्कू, कोमटा, कंजूस, हिमटा, खंक
गिरी – नग, पर्वत, अचल, अद्री, डोंगर
दुर्ग – किल्ला, वखार, गढी, कोट
धन – पैसा, द्रव्य, माया, संपत्ती, दौलत, लक्ष्मी
पक्षी – अंडज, विहंग, खग, द्विज, पाखरू
पगार – वेतन, तनखा, मेहनताना
पार्वती – दुर्गा, गौरी, उमा, भवानी, कन्याकुमारी
निमंत्रण – आमंत्रण, बोलावणं, आवतण
पद्धत – रिवाज, पद्धत, चाल, रीत, परंपरा
धंदा – व्यापार, उद्योग, व्यवसाय
सेवा – परिचर्या, नोकरी, शुश्रुषा, चाकरी
रागीट – संताप, क्रोधी, कोपिष्ट
हे पण वाचा : TCS IBPS Pattern Current Affairs 2023
परीक्षेला विचारण्यात आलेले समानार्थी शब्दावरती प्रश्न उत्तरे :
1) ‘अहि’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल ?
उत्तर : सर्प
2) ‘अस्थिर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
उत्तर : चंचल
3) ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?
उत्तर : अली
4) ‘मासा’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. उत्तर : मीन
5) ‘स्मरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
उत्तर : आठवण
महत्त्वाचे : यातील 10 ते 15 समानार्थी शब्द हे जसास तसे TCS व IBPS पॅटर्ननुसार घेतलेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत.
युट्यूब चॅनेल : मराठी नौकरी
टेलिग्राम चॅनेल : मराठी नौकरी