TCS IBPS Current Affairs Questions in 2023 | TCS IBPS पॅटर्ननुसार असलेले महत्त्वाचे चालू घडामोडी वर प्रश्न

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितका आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व इंग्रजी विषयाला महत्त्व देतो.

त्यामुळे आज आपण या पोस्टमध्ये 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या काळातील महत्त्वाचे 50 प्रश्न घेत आहोत, यातील काही प्रश्न आपल्याला जशास तसे परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्न आपल्याला तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती व तसेच TCS व IBPS मार्फत होणाऱ्या इतर सरळ सेवा परीक्षण साठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न उत्तरे आपण या पोस्टमध्ये घेत आहोत.

TCS IBPS Current Affairs Questions in 2023
TCS IBPS Current Affairs Questions in 2023

या पोस्टमधील सर्व प्रश्न हे वन लाइनर स्वरूपात असणारे महत्त्वाचे चालू घडामोडी (Current Affairs) चे प्रश्न उत्तरे असणार आहेत. तसेच या पोस्टमध्ये TCS व IBPS मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेतील चालू घडामोडींच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

मित्रांनो आपल्याला जर 50 प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या Macaish या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.

चालु घडामोडी प्रश्नोत्तरे (50 Current Affairs Questions)

1) 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली होती ?
उत्तर : ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड

2) 19 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2023 दरम्यान जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित झाली होती ?
उत्तर : बुडापेस्ट, हंगेरी

3) 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2023 दरम्यान अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती ?
उत्तर : न्यूयॉर्क

4) देशातील सर्वात जुन्या शेअर बाजारातील मुंबई शहर बाजार अर्थात BSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर : सुंदररामन राममूर्ती

5) मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेल्या मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : देवेन भारती

6) डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईची महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो ?
उत्तर : नागपूर

7) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे ?
उत्तर : ठाणे

8) कोणत्या कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार 1974 मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यास सुरुवात ?
उत्तर : डॉ. मनमोहन सिंग मेहता कमिटी

9) महसूल व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशातील पहिले पशुविज्ञान केंद्र कोठे उभारणार असल्याची घोषणा केली आहे ?
उत्तर : सावळी विहीर (अहमदनगर)

10) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे ?
उत्तर : अहिल्याबाई होळकर योजना

Telegram

11) भारत सरकारने पीएम मित्र या उपक्रमांतर्गत एकात्मिक वस्त्रोद्योग संकुलाची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे, त्यापैकी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्कला मंजुरी मिळाली आहे ?
उत्तर : अमरावती

12) नागरी हितासाठी नोकरशहांचे समर्पण आणि वचनबद्धता दृढ व्हावे व उत्कृष्ट सेवांना प्रोत्साहनासाठी दरवर्षी कोणत्या दिवशी सार्वजनिक लोकसेवा दिवस साजरा केला जातो ?
उत्तर : 21 एप्रिल

13) तिबेटचा तिसरा धर्मगुरू म्हणून विद्यमान धर्मगुरू दलाई लामा यांनी खालीलपैकी कोणत्या आठ वर्षे मुलाची निवड केली आहे ?
उत्तर : मंगोलियन मुलगा

14) लोकप्रतिनित्व कायद्याच्या कलम आठ नुसार खासदार किंवा आमदार यांना किती वर्ष काळासाठी कारावासाची शिक्षा सुनावली गेली असल्यास शिक्षा सुनावल्या गेल्यापासून शिक्षाच्या कालावधीपर्यंत व शिक्षा उपभोगून झाल्यापासून आणखी सहा वर्षापर्यंत सदर सदस्य अपात्र ठरतो ?
उत्तर : दोन किंवा त्याहून अधिक वर्ष काळासाठी

15) राज्य सरकारच्या सुमारे 33 योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी सरकार तुमच्या दारी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे ?
उत्तर : पश्चिम बंगाल

16) पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये असलेल्या वाघांच्या अन्नसुरक्षा अबाधित राहावी यासाठी कोणत्या अभयारण्यात चितळ प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
उत्तर : चांदोली अभयारण्य

हे पण वाचा : ZP भरती Book List

17) राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संसद वेळोवेळी कायद्याने ठरवेल तसेच वेतन व भत्ते मिळण्याचा अधिकार आहे ?
उत्तर : 106 वी तरतूद

18) जागतिक स्तरावरील नेत्यांच्या निर्णयांचे मूल्यमापन करणाऱ्या मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण बनले आहे ?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

19) कोरोनाच्या काळात विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी नौदलातर्फे कोणती मोहीम राबवण्यात आली होती ?
उत्तर : ऑपरेशन समुद्र सेतू

20) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ………. हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे .
उत्तर : 28 मे

Telegram

21) महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्याचे निश्चित केले आहे ?
उत्तर : 2027 पर्यंत

22) राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या भूमिकेसाठी त्याला देशातल्या कोणत्याही न्यायालयात जाब विचारला जाऊ शकत नाही ?
उत्तर : कलम 105(2)

23) राज्यात ग्रामपंचायत पंचायत समित्या, जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात आले आहे ?
उत्तर : ग्राम राजस्व अभियान

24) आदिवासी क्षेत्रामधील सामाजिक व आर्थिक बदलांच्या प्रक्रियेचा व आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने अनुसूचित जमातीच्या किती उमेदवारा करिता अभिछत्रवृत्तीत योजना राबवली जाणार आहे ?
उत्तर : 100 उमेदवाराकरिता

25) खालीलपैकी कोणत्या एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावले असून ही एका भारतीय चित्रपटाने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविण्याची पहिलीच वेळ आहे ?
उत्तर : आर आर आर

26) खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठा पहिला 5000 गाढवांचा फार्म उभारण्यात आला आहे. ?
उत्तर : तामिळनाडू (बाबू उलगनाथन यांनी)

27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षी लोहारातून 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला होता ?
उत्तर : 2016 साली

28) महाराष्ट्रात महाकवी कालिदास यांच्या स्मरणार्थ कालिदास महोत्सवाच्या आयोजन केले जाते हा उत्सव कोठे आणि किती दिवस चालतो ?
उत्तर : नागपूर, 2 दिवस

29) नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान महाराष्ट्र राज्यांनी वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी आखाती देशांसोबत सामाजिक करारावर सह्या केल्या. कोणता देश त्या देशांपैकी एक आहे ?
उत्तर : ओमान

30) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दोन शहरात दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसचे दूर संवादाद्वारे उद्घाटन केले आहे ?
उत्तर : दिल्ली ते डेहराडून

31) केंद्र सरकारने कोणत्या वर्षी 0 ते 6 वर्षे वयोगटासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अर्थात इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम – आय.सी.डी.एस सुरु केली ?
उत्तर : 1975 साली

32) भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्याच्या हेतूने कोणती यात्रा सुरू केली आहे ?
उत्तर : भारत गौरव यात्रा

33) ………………………. रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात शूद्रातीशूद्र जातीसाठी 50% सरकारी नोकऱ्या राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक आदेश दिला .
उत्तर : 26 जुलै 1902

Telegram

34) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच कायदा मंत्रालय दलित समाजाच्या नेत्याकडे आले आहे तर ते कायदामंत्री कोण आहेत ?
उत्तर : अर्जुन राम मेघवाल.

35) रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा उपयोग वाढविण्यासाठी कोणत्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे ?
उत्तर : पीएम प्रणाम

36) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मनोज सोनी.

37) इलेक्ट्रिक बॅटरी तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या लिथियम या धातूचा मोठा साठा राजस्थान मधील कोणत्या जिल्ह्यात आढळला असल्याचे राज्य सरकार आणि भारतीय संरक्षण संस्थेने जाहीर केले आहे ?
उत्तर : डेगाना जिल्हा – नागौर

38) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी लायगो अर्थात लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह
ऑब्झवेट्री ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे ?
उत्तर : औंढा नागनाथ जिल्हा – हिंगोली.

39) संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाकडून प्रसिद्ध केलेला अहवालानुसार जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश खालीलपैकी कोणता बनला आहे ?
उत्तर : भारत

40) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही मोहीम सुरू केली होती ?
उत्तर : सातारा

41) वाडिया समूहाची मालकी असलेल्या ………….. या परवडणाऱ्या दरात विमान सेवा देणाऱ्या नागरी विमान कंपनीने स्वतःहून दिवाळीखोरी जाहीर केली आहे .
उत्तर : गो फर्स्ट

हे पण वाचा :  महाराष्ट्र पोलीस भरती Book List

42) महाराष्ट्रातील ग्राहकांना कोणत्या ॲपवर ऑनलाईन मागणी नोंदवल्यानंतर सहाशे रुपये ब्रास व वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर ठरवून घरपोच वाळू देण्यात येणार आहे ?
उत्तर : महाखनिज ॲप

43) भारताच्या संपूर्ण भूप्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी संहिता निश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असे अनुच्छेद …………. .
उत्तर : अनुच्छेद 44

TCS IBPS Current Affairs Questions मागील परीक्षेस विचारलेले प्रश्न (44 ते 50)

44) पहिल्या वर्गात प्रवेशासाठी किमान वय किती निश्चित करण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत ?
उत्तर : सहा वर्षे

45) देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या रणजीच्या विजेत्यांना आता किती रुपये मिळणार आहेत ?
उत्तर : पाच कोटी रुपये (पुरुष संघास)

46) ओडिशातील भीषण तिहेरी रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी रेल्वे मंडळाच्या दक्षिण पूर्व मंडळाचे सुरक्षा आयुक्त ………….. यांच्या नेतृत्वाखाली अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे ?
उत्तर : ए. एम. चौधरी

47) कायद्यांना आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी स्मार्ट कार्ड फोन याची सुरुवात सुविधा प्रायोगिक तत्वावर कोणत्या कारागृहात पहिल्यांदा करण्यात आली ?
उत्तर : पुणे कारागृह

48) शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार आहे ?
उत्तर : महालाभार्थी संकेतस्थळ

49) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवा (मध्य प्रदेश) पंचायतराज पातळीवर सार्वजनिक खरेदीसाठी तयार केलेल्या एकीकृत कोणत्या पोर्टलचा अनावरण केलं ?
उत्तर : ई – ग्राम स्वराज्य आणि जीएम पोर्टल

50) भारताच्या नव्या विदेश व्यापार धोरणानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारताचे निर्यात 2000 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ?
उत्तर : 2030 पर्यंत


 

1 thought on “TCS IBPS Current Affairs Questions in 2023 | TCS IBPS पॅटर्ननुसार असलेले महत्त्वाचे चालू घडामोडी वर प्रश्न”

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price