TCS IBPS Pattern Current Affairs 2023 | TCS IBPS पॅटर्ननुसार असलेले महत्त्वाचे चालू घडामोडी वर प्रश्न

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितका आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी व इंग्रजी विषयाला महत्त्व देतो.

त्यामुळे आज आपण या पोस्टमध्ये 1 जानेवारी 2023 ते 30 ऑगस्ट 2023 या काळातील महत्त्वाचे 50 प्रश्न घेत आहोत, यातील काही प्रश्न आपल्याला जशास तसे परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रश्न आपल्याला तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती व तसेच TCS व IBPS मार्फत होणाऱ्या इतर सरळ सेवा परीक्षण साठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न उत्तरे आपण या पोस्टमध्ये घेत आहोत.

TCS IBPS Pattern Current Affairs 2023
TCS IBPS Pattern Current Affairs 2023

या पोस्टमधील सर्व प्रश्न हे वन लाइनर स्वरूपात असणारे महत्त्वाचे चालू घडामोडी (Current Affairs) चे प्रश्न उत्तरे असणार आहेत. तसेच या पोस्टमध्ये TCS व IBPS मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेतील चालू घडामोडींच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

मित्रांनो आपल्याला जर 50 प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या Macaish या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.

चालु घडामोडी प्रश्नोत्तरे (50 Current Affairs Questions)

1) भारतीय पुरावा कायदा 1872 या कायद्याची जागा कोणता नवीन कायदा घेणार आहे ?
उत्तर : भारतीय साक्ष संहिता

2) किर्लोस्कर उद्योग समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना राज्य शासनाच्या कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
उत्तर : महिला उद्योजक पुरस्कार

3) मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य निवडणूक आयुक्त विधेयक राज्यसभेत मांडले असून यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची निवड करण्याच्या समितीतून कोणाला वगळले आहे ?
उत्तर : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना

4) राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मराठी उद्योजक पुरस्कार कोणाला देऊन सन्मानित तर करण्यात येणार आहे ?
उत्तर : नाशिकचा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विलास शिंदे

5) भारतीय दंड संहिता 1860 च्या जागी नवीन कायदा येण्यासाठी कोणते विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले ?
उत्तर : भारतीय न्याय संहिता विधेयक 2023

6) कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये केंद्र सरकारने देशांमध्ये समान नागरी कायदा अंमलबजावणी करू नये या संदर्भात मांडण्यात आलेला ठराव एकमताने मंजूर झाला ?
उत्तर : केरळ

7) राज्याच्या नव्या शासन निर्णयानुसार जिराईत जमीन किती गुंठे खरेदी विक्री करता येणार आहे ?
उत्तर : वीस गुंठे

8) जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण अशी मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे ?
उत्तर : नाशिक

9) बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक किरण दाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे ?
उत्तर : सातारा

10) लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधान करण्यात आला असून या पुरस्काराची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रकल्पाला देण्याची घोषणा केली ?
उत्तर : नमामी गंगे

Telegram

11) राष्ट्रीय ओबीसी आयोगाने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या कोणत्या आयोगाने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला ?
उत्तर : न्यायमूर्ती रोहिणी आयोग

12) जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांच्या मालकीच्या टेस्टलाचे भारतातील पहिले कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे ?
उत्तर : पुणे

13) कोणत्या योजनेअंतर्गत असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभावाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येणार आहे ?
उत्तर : पीएमश्री योजना

14) व्यक्तीमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येत आहे ?
उत्तर : नवभारत साक्षरता अभियान

15) कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करिता राज्यात कोणती योजना राबवली जाते ?
उत्तर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

16) ……….. या योजनेत तेलंगणा सरकारकडून अनुसूचित जातींच्या कुटुंबीयांना सरकारकडून दहा लाखापर्यंत अनुदानाची रक्कम प्राप्त होते.
उत्तर : दलित बंधू योजना

17) भारताने आपल्या नौदलाच्या ताफ्यातील कोणती क्षेपणास्त्र वाहू युद्ध नका वियतनामला भेट म्हणून प्रदान केली आहे ?
उत्तर : आय एन एस कृपान

18) देशात खालीलपैकी कोणत्या राज्याने सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित केले आहे ?
उत्तर : सिक्कीम आणि मेघालय

19) कोणत्या वर्षी होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदातून ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया राज्याने तडकाफडकी माघार घेतली आहे ?
उत्तर : 2026 च्या

20) महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या वर्षापर्यंत एक लाख कोटी डॉलरचे उद्दिष्ट घटनेचे लक्ष ठेवण्यात आले आहे ?
उत्तर : 2028

21) मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदी मध्ये करणारे पहिले देशातील राज्य कोणते आहे ?
उत्तर : मध्यप्रदेश

हे पण वाचा : TCS IBPS Current Affairs Questions in 2023

22) हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार हरित रोख्यांच्या (ग्रीन बाँड) यांच्या माध्यमातून किती रुपये उभारणार आहे ?
उत्तर : पाच हजार करोड

23) मराठा आणि कुणबी समाजातील ७५ विद्यार्थ्यांसाठी कोणत्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली ?
उत्तर : सयाजीराव गायकवाड सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजना

24) जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपनी कोणती आहे ?
उत्तर : फॉक्सकॉन

25) ज्येष्ठ समाजवादी नेते …………. यांना पहिला पुरस्कार पदान करून 1983 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात झाली.
उत्तर : एस. एम. जोशी

26) केंद्र सरकारच्या वतीने सन 2023 साठी जाहीर झालेला कोणता पद्म पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला ?
उत्तर : पद्मविभूषण

27) मुंबई पवई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग येथे कशाची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे ?
उत्तर : आय आय एम

28) रिझर्व बँक ऑफ इंडिया विनिमयात संस्थांच्या विरुद्ध तक्रारींच्या निवारणासाठी एक सकल सुविधा सुरू केली आहे ती कोणती ?
उत्तर : रिझर्व बँक एकात्मिक लोकपाल योजना

Telegram

29) अमेरिकेतील नासा हे अवकाश संशोधन संस्था आणि भारताची इस्त्रो यांच्या वतीने संयुक्तपणे राबवण्यात येणारी मोहीम अवकाश संशोधन कोणती ?
उत्तर : निसार

30) केंद्र सरकारने हवामान बदलांच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी हरित रोख्यांच्या माध्यमातून किती रुपये उभे करण्याचे ठरवले आहे ?
उत्तर : सोळा हजार करोड रुपये

31) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे, राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत भारतातील पहिल्या टॅक्सी वे चे उद्घाटन कोणत्या विमानतळावर करण्यात आले आहे ?
उत्तर : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली

32) अंतर्गत राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना 125 दिवसांच्या वेतनाची हमी देणारा कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर : राजस्थान

33) हरवलेल्या मुलांना परत आपल्या घरी सोडण्यासंदर्भातची ऑपरेशन नन्हे फरिश्ते कोणत्या मंत्रालयामार्फत राबविण्यात येते ?
उत्तर : रेल्वे मंत्रालय

34) पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी किती रुपये तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहेत ?
उत्तर : सहा हजार रुपये

35) केंद्र सरकारने कोणते वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?
उत्तर : 2023

36) महाराष्ट्र कृषी व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : डॉक्टर नितीन वसंतराव पाटील

37) दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

38) पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट रोजी राज्यात कोणता दिवस साजरा केला गेला ?
उत्तर : शेतकरी दिन

39) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मार्च 2010 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ पॅनलची स्थापना केली ?
उत्तर : डॉ. माधव गाडगीळ

40) बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2023 पासून कोणता कार्यक्रम हाती घेतला आहे ?
उत्तर : मिशन इंद्रधनुष्य 5.0

Telegram

41) राज्यघटनेच्या कितव्या कलमांतर्गत राज्याच्या नावात केरळ ऐवजी केरळ अशी दुरुस्ती करण्याचे एकमुखी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे ?
उत्तर : कलम 3

42) दंड प्रक्रिया संहिता 1889 या कायद्याची जागा कोणता नवीन कायदा घेणार आहे ?
उत्तर : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता

43) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ………. हे सूर्य आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात दाखल करण्यात आले.
उत्तर : आदित्य एल 1

44) नाशिक मधील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांना राज्य शासनाच्या कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
उत्तर : मराठी उद्योजक पुरस्कार

45) मुख्यमंत्री लाडली बहना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?
उत्तर : मध्य प्रदेश

46) जून 2015 पासून केंद्र सरकारने कोणत्या वयोगटातील भारतीयांसाठी एक ते पाच हजार रुपये दर महा पेन्शन मिळावी यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे ?
उत्तर : 18 ते 40 वर्षे

47) राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण दुरुस्तीसाठी कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ?
उत्तर : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास

48) मणिपूर मध्ये लोकसंख्येत 53% प्रमाण असणाऱ्या कोणत्या समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला ?
उत्तर : मैतेई समाज

49) पंतप्रधानपदी असताना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा प्रदान करण्यात येणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत ?
उत्तर : पाहिले

50) रशियाची चंद्र मोहीम लूना 25 प्रक्षेपित करण्यात आले असून ते चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर उतरले आहे ?
उत्तर : दक्षिण ध्रुव

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price