Maharashtra Police Bharti 2024 Questions 04 | Police Bharti 2023 च्या पुणे लोहमार्ग पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. ‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) धरा
2) सुमन
3) कांचना
4) नीर
उत्तर : 4) नीर
स्पष्टीकरण : पाणी- उदक, निर,जल , सलिल.
प्रश्न 2. ‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
1) खूप घाबरणे
2) भरपूर फायदा होणे
3) निष्फळ होणे
4) संपूर्ण नाश होणे
उत्तर : 2) भरपूर फायदा होणे
स्पष्टीकरण : उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे भरपूर फायदा होणे.
बारा वाजविणे – नाश करणे.
बोल लावणे – दोष देणे.
प्रश्न 3. कुपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?
1) संकुचित वृत्तीचा
2) भांडण करणारा
3) रागीट स्वभावाचा
4) चैनखोर वृत्तीचा
उत्तर : 1) संकुचित वृत्तीचा
स्पष्टीकरण : कुपमंडूक- संकुचित वृत्तीचा
अजातशत्रू -शत्रु नसलेला
कच्चे मडके- अर्धवट ज्ञानी.
प्रश्न 4. हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात. यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
1) गुणवाचक विशेषण
2) सर्वनामिक विशेषण
3) क्रमवाचक विशेषण
4) आवृत्ती वाचक विशेषण
उत्तर : 1) गुणवाचक विशेषण
प्रश्न 5. ‘मनात घर करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
1) मनाप्रमाणे वागणे
2) मनात कायमचे राहणे
3) राग येणे
4) राग येईल तसे बोलणे
उत्तर : 2) मनात कायमचे राहणे
स्पष्टीकरण : मनात घर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ मनात कायमचे राहणे हा होय.
मन खाने -मनाला टोचणी लागणे.
मन बसणे -फार आवडणे.
प्रश्न 6. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
1) पुणे
2) नागपूर
3) मुंबई
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक
स्पष्टीकरण : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ -नाशिक 1998
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ -नाशिक 1989
महिला विद्यापीठ- मुंबई 1916
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ- नागपूर
संत विद्यापीठ -पैठण
तंत्रज्ञान विद्यापीठ- लोणेरे ( रायगड)
संस्कृत विद्यापीठ -रामटेक (नागपूर)
हिंदी विद्यापीठ- वर्धा
सहकार विद्यापीठ -पुणे 2022
छत्रपती क्रीडा विद्यापीठ -( पुणे)
प्रश्न 7. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कधी झाली ?
1) 15 ऑगस्ट 1947
2) 1 एप्रिल 1935
3) 20 जानेवारी 1950
4) 1 एप्रिल 1925
उत्तर : 2) 1 एप्रिल 1935
स्पष्टीकरण : भारतीय रिझर्व बँकेची स्थापना एक एप्रिल 1935 रोजी झाली.
1926-आरबीआय स्थापन्याची यंग हिल्टन समितीची शिफारस.
1949- आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
मुंबई येथे आरबीआयचे मुख्यालय आहे.
आरबीआयचे -पहिले गव्हर्नर ऑसबर्न स्मिथ व पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी .देशमुख.
प्रश्न 8. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) पेरांबुर
2) पुणे
3) मुंबई
4) जयपुर
उत्तर : 1) पेरांबुर
स्पष्टीकरण : रेल्वे इंजिन्स निर्मिती कारखाना- चित्तरंजन (पश्चिम बंगाल)
रेल्वे डबे निर्मिती कारखाना -पेरांबुर (तामिळनाडू)
डिझेल इंजिन्स निर्मिती -(उत्तरप्रदेश)
प्रश्न 9. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो ?
1) 24 एप्रिल
2) 2 ऑक्टोबर
3) 15 ऑगस्ट
4) 26 जानेवारी
उत्तर : 1) 24 एप्रिल
स्पष्टीकरण : 20 एप्रिल या रोजी पंचायत राज हा दिवस साजरा केला जातो. पंचायत राज हे नाव पंडित नेहरूंनी सुचविले होते.
पंचायतराज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. 2 ऑक्टोबर 1959 पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले.
26 नोव्हेंबर- संविधान दिन
7 डिसेंबर- सशस्त्र सेना ध्वजदिन
22 जुलै- राष्ट्रीय ध्वज दिन
24 एप्रिल- पंचायतराज दिन
प्रश्न 10. रिडल्स इन हिंदुस्तान हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) स्वातंत्र्यवीर सावरकर
4) यापैकी नाही
उत्तर : 1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण : रिडल्स इन हिंदुस्तान हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्यकृती – कास्ट इन इंडिया, द अनटचेबल्स, थॉटस ऑन पाकिस्तान, रानडे,गांधी व जिना, शूद्र कोण होते, बुद्ध अँड हिज धम्म, दि प्रॉब्लेम ऑफ रुपी, जातिव्यवस्थेचे निर्मूलन.
प्रश्न 11. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संपूर्ण नाव ………… असे होते ?
1) माणिक बंडोजी इंगळे
2) देबुजी झिंगराजी जानोरकर
3) माणिक खंडोजी महाराज
4) यापैकी नाही
उत्तर : 1) माणिक बंडोजी इंगळे
स्पष्टीकरण : पूर्ण नाव -माणिक बंडोजी इंगळे
जन्म -यावली जि.अमरावती 30 एप्रिल 1909
मृत्यू:-गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती 11 ऑक्टोबर 1968.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली.
संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे.
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
प्रश्न 12. ऑलिव्ह रीडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे ?
1) नीरा
2) मुरुड
3) वेळास
4) निळास
उत्तर : 3) वेळास
स्पष्टीकरण : ऑलिव्ह रीडले कासव समुद्रात मुबलक प्रमाणात आढळतात.
प्रजाती आय.यु. सी. एन. च्या तांबड्या यादीत समाविष्ट आहे.
अंडी घालण्यासाठी ही कासवे समुद्रातून किनाऱ्यावर येतात.
ओडिसातील गहिरमाथा सागरी अभयारण्यात या कासवांचे प्रजनन स्थलांतर पाहायला मिळते.
महाराष्ट्रात वायंगणी जिल्हा सिंधुदुर्ग येथे कासवाचे प्रजनन व संवर्धन केले जाते.
महाराष्ट्रात वेळास आणि तारकर्ली येथे सागरी संवर्धन केंद्रे आहेत.
प्रश्न 13. रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते ?
1) कोकण प्रदेश
2) डोंगराळ प्रदेश
3) वाळूचा प्रदेश
4) दख्खनचे पठार
उत्तर : 4) दख्खनचे पठार
स्पष्टीकरण : मुख्यतः बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या काळया जमिनीला रेगूर म्हणतात.
काळया मृदेत पाणी ओलावा धरण्याची क्षमता जास्त असते कारण या मृदेत चुनखडीचे प्रमाण अधिक असते.
काळा रंग – टीत्यानी फेरस मॅग्नाइट मुळे . काळी मृदा /कापसाची काळी मृदा/ रेगूर मृदा असे म्हणतात.
प्रश्न 14. भारतातील पहिली रेल्वे दिनांक 16/4/1853 रोजी कुठून कोठे धावली ?
1) बोरीबंदर ते ठाणे
2) ठाणे ते पुणे
3) कल्याण ते ठाणे
4) पुणे ते मुंबई
उत्तर : 1) बोरीबंदर ते ठाणे
स्पष्टीकरण : 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली .तिला तीन इंजिन जोडण्यात आले सिंध, साहिब,सुलतान.
विद्युत रेल्वेची सुरुवात- मुंबई 1925
कोकण रेल्वेची सुरुवात -1998 साली झाली. 756. किमी.
भारतात कोलकत्ता येथे मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली.
प्रश्न 15. अरवली पर्वत रांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे ?
1) गुरुशिखर
2) कळसुबाई
3) धुपगड
4) नागेश्वर
उत्तर : 1) गुरुशिखर
स्पष्टीकरण : अरवली पर्वत रांगात सर्वाधिक उंचीचे शिखर गुरुशिखर हे आहे.
गुरुशिखर- 1722 मी. अरवली पर्वत
सद्भावना- 752 मी. विंध्य पर्वत
कळसुबाई- 1646 मी. सह्याद्री
धूपगड -1350 मी.सातपुडा
अण्णाइमुडी 2695 मी. पश्चिम घाट
दोडाबेट्टा 2637 मी. निलगिरी
प्रश्न 16. सध्याचे विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह), महाराष्ट्र शासन कोण आहे ?
1) नितीन करीर
2) संजय वर्मा
3) श्रीपाद कुलकर्णी
4) आनंद लिमये
उत्तर : 4) आनंद लिमये
स्पष्टीकरण : महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सैनिक हे आहेत.
प्रश्न 17. सतीबंदीचा कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरल ने संमत केला ?
1) विल्यम बेटिंग
2) रॉबर्ट क्लाइव्ह
3) लॉर्ड कर्झन
4) स्पीर्ड कर्झन
उत्तर : 1) विल्यम बेटिंग
स्पष्टीकरण : सतीबंदीचा कायदा 1829 ला विल्यम बेटिंग या गव्हर्नर जनरल ने संमत केला
विल्यम बेटिंग यांचा कार्यकाळ 1828 ते 1833
बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल व भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833.
सती प्रथा बंदी कायदा 1829
शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लागू केला.
प्रश्न 18. मा. पंतप्रधान भारत सरकार यांनी दिनांक 10/ 2/ 2023 रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या कोणत्या रेल्वेचे उद्घाटन केले ?
1) वंदे मातरम
2) वंदे भारत
3) जय भारत
4) जय इंडिया
उत्तर : 2) वंदे भारत
स्पष्टीकरण : पहिली वंदे भारत रेल्वे- दिल्ली -वाराणसी
प्रश्न 19. पुढील शब्दाचा समास ओळखा .दररोज
1) द्वंद्व
2) बहुव्रीहि
3) तत्पुरुष
4) अव्ययीभाव
उत्तर : 4) अव्ययीभाव
स्पष्टीकरण : अव्ययीभाव समास -अव्ययीभाव समासात पहिले पद प्रधान असते.
उदा. पावलोपावली, यथाशक्ती, क्षणोक्षणी.
प्रश्न 20. महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय ?
1) Force1
2) Force10
3) Commando 1
4) Egla force
उत्तर : 1) Force1
प्रश्न 21. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील खालील ठिकाणी प्रस्तावित आहे?
1) इंदू मिल
2) जुहू चौपाटी
3) गेटवे ऑफ इंडिया
4) आझाद मैदान
उत्तर : 1) इंदू मिल
स्पष्टीकरण : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबई दादर येथील हिंदू मिल ठिकाणी प्रस्थापित आहे.
स्मारकाचे काम 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष.
प्रश्न 22. ‘कोसला’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
1) नामदेव ढसाळ
2) भालचंद्र नेमाडे
3) बाबुराव बागुल
4) नरहर कुरुंदकर
उत्तर : 2) भालचंद्र नेमाडे
स्पष्टीकरण : भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली.
प्रश्न 23. संत एकनाथ महाराज यांची समाधी स्थळ कोठे आहे ?
1) आळंदी
2) पैठण
3) देहू
4) शेगाव
उत्तर : 2) पैठण
स्पष्टीकरण : एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ पैठण येथे आहे.
प्रश्न 24. …….. हे तंबाखू मध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे.
1) निकोटीन
2) नायट्रोजन
3) क्लोरीन
4) हायड्रोजन
उत्तर : 1) निकोटीन
स्पष्टीकरण : निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे.
प्रश्न 25. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ?
1) जठर
2) यकृत
3) आतडे
4) मोठे आतडे
उत्तर : 2) यकृत
स्पष्टीकरण : कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृत या अवयवास होतो.