Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ?
1) ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट.
2) ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण.
3) ताऱ्यांची गती
4) वायु मंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक
उत्तर : 4) वायु मंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक
स्पष्टीकरण : ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण म्हणजे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक होय.
कारण हवेतील तारे आणि वादळांचे खूप जास्त अंतर आणि हवेतील घनता या मध्ये चढउतार.
प्रश्न 2. 1949 मध्ये ………. येथे राष्ट्रीय वस्तु संग्रहालयाची स्थापना झाली.
1) मुंबई
2) कलकत्ता
3) दिल्ली
4) ग्वालियर
उत्तर : 3) दिल्ली
स्पष्टीकरण : स्थापना- 1949, वास्तुकार -गणेश देवलालीकर
प्रश्न 3. भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशास…….. म्हणून ओळखतात.
1) उत्तर भारतीय मैदान
2) द्वीप समूह
3) उच्चभूमी
4) द्वीपकल्प
उत्तर : 4) द्वीपकल्प
स्पष्टीकरण : द्वीपकल्प म्हणजे तीन बाजूंनी समुद्र असलेला भूभाग होय. यात दक्षिण व मध्य भारताचा समावेश होतो.
प्रश्न 4. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत पण ते संसदेचे अविभाज्य भाग आहेत ?
1) पंतप्रधान
2) राष्ट्रपती
3) भारताचे महान्यायवादी
4) यापैकी नाही
उत्तर : 2) राष्ट्रपती
स्पष्टीकरण : संसदेचे तीन घटक- राष्ट्रपती ,लोकसभा व राज्यसभा
राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक असतात ,परंतु ते संसद सदस्य नसतात.
त्यांची निवड विधानसभा, लोकसभा व राज्यसभा सदस्या मधून होते.
प्रश्न 5. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाले होते ?
1) असीम कुमार
2) बाबू गेनू
3) अच्युतराव पटवर्धन
4) शिरीष कुमार
उत्तर : 4) शिरीष कुमार
स्पष्टीकरण : 1942 च्या गांधींच्या ब्रिटिशाविरुद्ध भारत छोडो आंदोलनामध्ये आंदोलन करीत असताना शिरीष कुमार शहीद झाले होते.
प्रश्न 6. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ?
1) विस्तार अधिकारी
2) ग्रामसेवक
3) गटविकास अधिकारी
4) सभापती
उत्तर : 3) गटविकास अधिकारी
स्पष्टीकरण : पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून गटविकास अधिकारी हे कार्य करत असतात.
ग्रामसेवक -ग्रामपंचायतचा सचिव असतो.
सभापती- पंचायत समितीचा प्रमुख सभापती असतो.
प्रश्न 7. टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो?
1) क्लोरोफिल
2) लायकोपीन
3) अँथोसायनिंन
4) झेंतोफिल
उत्तर : 2) लायकोपीन
स्पष्टीकरण : क्लोरोफिल – हिरव्या वनस्पतीमध्ये असलेले नैसर्गिक संयुग आहे.
झेंथोफिल- वनस्पती दोन प्रकारची द्रव्य तयार करतात त्यामध्ये दोन प्रकारची द्रव्य पहावयास मिळतात हरितद्रव्य पानांमध्ये आणि पानसदृश्य भागामध्ये असतात तर त्यास मदत करण्यासाठी लाल एक्सांथोफिल असतात.
प्रश्न 8. मा. गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य ( वन मॅन आर्मी) असे कोणी केले ?
1) लॉर्ड माउंटबॅटन
2) लॉर्ड वेलस्ली
3) लॉर्ड कर्जन
4) लॉर्ड हार्डिंग
उत्तर : 1) लॉर्ड माउंटबॅटन
स्पष्टीकरण : महात्मा गांधीजींचे वर्णन वन मॅन आर्मी एका माणसाचे सैन्य असे वर्णन लॉर्ड माऊंटबॅटन यानी केले.
लॉर्ड माउंटबॅटन -भारताचा शेवटचा व्हाईसरॉय.
प्रश्न 9. 22 वी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट अवॉर्ड चा मानकरी कोण ?
1) कायलियन एमबापे
2) नेमार दा सिल्या
3) ख्रिस्तियानो रोनाल्डो
4) लिओनेल मेसी
उत्तर : 4) लिओनेल मेसी
स्पष्टीकरण : बाविसावी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूट चा मानकरी लिओनेल मेस्सी हा होय.
विजेता संघ -अर्जेंटिना
उपविजेता संघ – फ्रान्स
प्रश्न 10. खालीलपैकी कोण G- 20 राष्ट्रसमूहाचा सदस्य नाही ?
1) कॅनडा
2) पोलंड
3) जपान
4) सौदी अरेबिया
उत्तर : 2) पोलंड
स्पष्टीकरण : G-20 समूहात सध्या 21 देश आहेत. नवीन 21 वा आफ्रिकीय संघ
स्थापना -1999.
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
प्रश्न 11. खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही ?
1) प्राणहिता
2) कुंडलिका
3) प्रवरा
4) पवना
उत्तर : 4) पवना
स्पष्टीकरण : गोदावरीच्या उपनद्या -प्राणहिता, कुंडलिका, प्रवरा, इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा, मांजरा.
पवना -ही भीमा नदीची उपनदी आहे.
प्रश्न 12. ‘ईश्वर निर्मिक’ आहे असे कोणी म्हटले ?
1) स्वामी दयानंद सरस्वती
2) संत तुकाराम
3) महात्मा ज्योतिबा फुले
4) संत एकनाथ
उत्तर : 3) महात्मा ज्योतिबा फुले
स्पष्टीकरण : ईश्वर निर्मिक आहे असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे.
प्रश्न 13.’ घाशीराम कोतवाल’ हे नाटक कोणी लिहिले ?
1) श्रीराम लागू
2) के शिवराम कांत
3) प्रल्हाद केशव अत्रे
4) विजय तेंडुलकर
उत्तर : 4) विजय तेंडुलकर
स्पष्टीकरण : काशीराम कोतवाल हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे.
प्रल्हाद अत्रे -झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
प्रश्न 14. फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे ?
1) सॉफ्टवेअर प्रॉडक्ट
2) ई-कॉमर्स
3) ट्रॅव्हल अँड टुरिझम
4) शेअर ट्रेडिंग
उत्तर : 2) ई-कॉमर्स
स्पष्टीकरण : फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः ई-कॉमर्स म्हणजेच ऑनलाइन व्यापार संबंधित आहे.
प्रश्न 15. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड-19 ची लस कोणती ?
1) कोविशील्ड
2) कोविड-19
3) कोव्हॅक्सिन
4) झायकॉह -डी
उत्तर : 3) कोव्हॅक्सिन
स्पष्टीकरण : भारत बायोटेक कंपनी -कोव्हॅक्सिन
सिरम – कोविशील्ड
कोरोना विषाणूशी लढणाऱ्या लसी.
प्रश्न 16. 2024 साली ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
1) ब्राझील
2) अमेरिका
3) ग्रीस
4) फ्रान्स
उत्तर : 4) फ्रान्स
स्पष्टीकरण : 2024 ऑलिंपिक स्पर्धा पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे.
ऑलम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात.
2021 -टोकियो जपान
2028- लॉस एंजलिस अमेरिका
प्रश्न 17. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे ?
1) झारखंड
2) छत्तीसगड
3) आसाम
4) ओडिसा
उत्तर : 1) झारखंड
स्पष्टीकरण : राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु ह्या ओडीसा राज्यातील आहेत.
पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत.
प्रश्न 18. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) संसद
2) पंतप्रधान
3) लोकसभा
4) मुख्य न्यायाधीश
उत्तर : 1) संसद
स्पष्टीकरण : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे.
संख्या -संसद ठरवते
नेमणूक -राष्ट्रपती करतात
शपथ -राष्ट्रपती देतात
पगार व पेन्शन -केंद्र सरकार देते.
प्रश्न 19. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ……….. आहे ?
1) एक
2) दोन
3) तीन
4) सात
उत्तर : 1) एक
स्पष्टीकरण : अल्क धातूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो. असे मूलद्रव्य एक इलेक्ट्रॉन देऊन संतृप्त होतात व अष्टक पूर्ण करतात.
प्रश्न 20. पोलीस शहीद स्मृतिदिन हा …………. या दिवशी पाळला जातो.
1) 9 ऑगस्ट
2) 15 सप्टेंबर
3) 21 ऑक्टोबर
4) 9 ऑक्टोबर
उत्तर : 3) 21 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : पोलीस शहीद स्मृतिदिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी पाळला जातो.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन- 2 जानेवारी
भूदल दिवस -15 जानेवारी
एस.आर .पी .एफ. रेझिंग डे- 6 मार्च
वायुदल दिवस -8 ऑक्टोबर
पोलीस स्मृतिदिन – 21 ऑक्टोबर
आय .टी. बी .पी दिवस – 24 ऑक्टोबर
बीएसएफ दिन – 1 डिसेंबर
प्रश्न 21. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ……………… यांनी केला.
1) जेम्स मिल
2) जॉन मार्शल
3) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टंट
4) फ्रेडरिक मॅक्समुल्लर
उत्तर : 4) फ्रेडरिक मॅक्समुल्लर
स्पष्टीकरण : फ्रेडरिक मॅक्समुल्लर हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.
फ्रेडरिक मॅक्समुल्लर जर्मन संस्कृत पंडित होते.
प्रश्न 22. धाण्याचा साठा, वितरण ,वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे ?
1) महाफेड
2) भारतीय अन्न महामंडळ
3) नाफेड
4) नाबार्ड
उत्तर : 2) भारतीय अन्न महामंडळ
स्पष्टीकरण : धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचे कार्य भारतीय अन्न महामंडळाचे असते.
नाफेड -भारतीय कृषी सहकारी विकास संघ लिमिटेड कृषी व शेतकरी कल्याण साठी
नाबार्ड -स्थापना 1982 ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र समृद्ध करणे हा उद्देश आहे.
प्रश्न 23. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
1) आती पर्जन्याचा प्रदेश
2) ओल्या दुष्काळाचा प्रदेश
3) पर्जन्य छायेचा प्रदेश
4) तराई प्रदेश
उत्तर : 3) पर्जन्य छायेचा प्रदेश
स्पष्टीकरण : सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
सह्याद्रीच्या पूर्वेकडे घाटमाथ्यापेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात.
प्रश्न 24. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ?
1) मराठवाडा
2) पश्चिम महाराष्ट्र
3) विदर्भ
4) खानदेश
उत्तर : 1) मराठवाडा
स्पष्टीकरण : मांजरा पठार हे महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात आहे. बीड जिल्ह्यात प्रामुख्याने . मांजरा नदी मांजरा पठारावरून वाहते.
प्रश्न 25. ‘उपोदघात’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1) उपकार
2) उपसंहार
3) प्रशंसा
4) अपकार
उत्तर : 2) उपसंहार
स्पष्टीकरण : उपोदघात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उपसंहार आहे.