Preparation For Police Bharti 2024 in 100 Days : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा काळ मानला जातो. त्यापैकी 2024 हे वर्ष थोडं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अवघड होत आहे. कारण याच वर्षी 2024 ची निवडणुकी येत आहे, त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे लक्ष थोडसं अभ्यासापासून दुरावलं गेलं आहे असं आपल्याला पाहायला येत आहे.
कारण वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद भरतीतील काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत, आणि काही पदांच्या परीक्षा बाकी आहेत त्यातच पोलीस भरतीची जाहिरात आली आणि फक्त परीक्षा फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत.
जे विद्यार्थी आधीपासून पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की लवकर पोलीस भरती निघाली आहे, पण अडचण अशा लोकांसाठी आहे जे लोक पहिल्यांदा परीक्षा देणार आहेत.
तर आज आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची पोस्ट घेऊन आलो आहोत ती म्हणजे पोलीस भरतीसाठी अजून कसल्याही प्रकारची मैदानी किंवा लेखी परीक्षेची तारीख मिळालेली नाही, तरीही आपण अंदाज म्हणून तीन महिने अंदाजित पकडून, आणि आपण 100 दिवसात कशा पद्धतीने अभ्यास करायचा यावर थोडंसं लक्ष केंद्रित करू.
तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम (Syllabus) समजावून घेऊया. सर्वात पहिले म्हणजे पोलीस भरतीमध्ये इंग्रजी हा घटक नसतो. म्हणजेच पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान अशा चार घटकांवर सर्व पोलीस भरती अवलंबून आहे.
पोलीस भरती अभ्यासक्रम (Police Bharti Syllabus) :
पोलीस भरती 2024 साठी सध्या जवळपास पाच पदांची भरती होणार आहे, पोलीस शिपाई, पोलीस बँड्समन, पोलीस शिपाई-वाहन चालक, SRPF (राज्य राखीव पोलीस दल), आणि कारागृह शिपाई असे सर्व पद मिळून 17311 जागा पोलीस भरती 2024 साठी असणार आहेत.
यामध्ये जवळपास सर्व पदासाठी सारखेच परीक्षा म्हणजे सारखेच प्रश्न असतात. तू पोलीस शिपाई-वाहन चालक हे पद असं आहे की त्यावर आपल्याला थोडेसे वाहन चालक या घटकावर काही प्रश्न विचारले जातात. मात्र सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही सारखीच आहे.
पोलीस भरती 2024 मधील लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू या.
लेखी परीक्षेमध्ये मुख्य चार घटक आहेत.
मराठी व्याकरण
अंकगणित
बुद्धिमत्ता चाचणी
सामान्य ज्ञान+चालू घडामोडी
Police Bharti New Exam Pattern कसा आहे ?
मराठी व्याकरण (Marathi Grammar):
मित्रांनो मराठी व्याकरण हा विषय महत्त्वाचा घटक असून यामध्ये
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
अलंकारिक
शब्द
लिंग
वचन
संधी
मराठी वर्णमाला
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
काळ
प्रयोग
वाक्प्रचार
म्हणी
शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकांचा समावेश मराठी व्याकरणात केलेला आहे.
अंकगणित (Math) :
अंकगणित हा असा विषय आहे की यामध्ये आपल्याला सर्वात जास्त गुण घेण्याची संधी असते. कारण यामध्ये काही निवडक घटकांवरच महत्वाचे प्रश्न नेहमीच विचारले जातात. त्यामध्ये
संख्या व संख्यांचे प्रकार
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार
कसोट्या
पूर्णांक अपूर्णांक व त्यांचे प्रकार
मसावी लसावी
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ काम वेग
दशमान पद्धती
नफा तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज,
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम या सर्व घटकांवर महत्त्वाचे प्रश्न हे नेहमी विचारले जातात.
हे पण वाचा : TCS IBPS Pattern Current Affairs 2023
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) :
बुद्धिमत्ता चाचणी मध्ये आपल्याला
अक्षर मालिका
अंक मालिका
वेन आकृती
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपी
दिशावर आधारित प्रश्न
नातेसंबंध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न
असे काही घटक आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये विचारले जातात.
सामान्य ज्ञान (Gk) :
सामान्य ज्ञान हा असा विषय आहे की 25 प्रश्नांसाठी भरपूर घटक यामध्ये विचारले जातात. सामान्य ज्ञान मध्ये पहायला गेलं तर महाराष्ट्र भूगोल
भारत भूगोल
इतिहास
तंत्रज्ञान
महत्वाच्या योजना
खेळावर आधारित प्रश्न
तसेच पोलीस भरती प्रशासनावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये पंचायतराज हा घटक थोडासा विशेष लक्ष देण्याकरिता आहे.
सामान्य विज्ञान मध्ये पाच ते सहा महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये विविध शास्त्र व त्यांचे अभ्यास, शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर, शोध व त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य, असे काही निवडक घटक सामान्य विज्ञान मध्ये आढळतात.
पोलीस भरती पॅटर्न आणि अभ्यासक्रम आपण समजावून घेतला आता आपण त्याचं नियोजन कसं करावं ? आणि काय काय वाचायला पाहिजे ? हे पाहणार आहोत.
100 दिवसांचे नियोजन :
काही विद्यार्थी म्हणतात की दररोज दहा दहा तास अभ्यास केला पाहिजे. पण मित्रांनो, माझा अनुभव आहे की दररोज फक्त 3-4 तास अभ्यास असावा. जास्त वेळा हातात पुस्तक घेणं म्हणजे अभ्यास होत नाही तर आपण 3-4 तासात किती मन लावून वाचन करतो, रीविजन करतो, आकलन करतो, त्याला अभ्यास करणं म्हणतात.
या पोस्टमध्ये जे सांगत आहे तो माझा वैयक्तिक अनुभव आहे, तर मी तीन महिन्यात अशा पद्धतीने अभ्यास केला होता.
सर्वात आधी अभ्यासक्रम नीट समजून घ्यायचा. 100 दिवसाचं नियोजन 4 भागात करायचं आहे. याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक विषयासाठी 25 दिवस असा अर्थ मुळीच होत नाही.
दररोज फक्त एक ते दोन तास प्रत्येक विषयासाठी देण गरजेच आहे. जो विषय आपल्याला थोडासा अवघड वाटतो त्यावर अधिक लक्ष द्यावे.
यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मागील तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका दररोज अभ्यासाव्यात कारण की लगेच आपल्याला परीक्षेचा पॅटर्न समजून येईल.
मित्रांनो आपण 2021, 2022 व 2023 वर्षाची सर्व प्रश्नपत्रिका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रश्नपत्रिका pdf सहित यूट्यूब चॅनेलवर टेलिग्राम चॅनल वर दिलेले आहेत.
युट्यूब चॅनेल : मराठी नौकरी
टेलिग्राम चॅनेल : मराठी नौकरी