ZP Bharti Book List: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मित्रांनो 2022 ते 2024 हे तीन वर्षांमध्ये सरळ सेवा भरती परीक्षा मध्ये भरपूर बदल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गेल्या वर्षी पर्यंत म्हणजे 2023 मध्ये सरळ सेवा परीक्षा संबंधित विभाग हा आपापल्या परीक्षेची तयारी घेत होता.
पण 2023 पासून जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरती या परीक्षेचं कंत्राट हे IBPS पॅटर्ननुसार होत आहे. म्हणजे सध्या पाहायला गेलं तर पोलीस भरती सोडता सर्व स्पर्धा परीक्षा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार होत आहेत.
सध्या आहे मे 2024, तर मित्रांनो सध्या जिल्हा परिषद भरतीतील काही पदांच्या परीक्षा बाकी आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या देखील काही पदभरती बाकी आहेत.
आज आपण जिल्हा परिषद भरती आणि सार्वजनिक आरोग्य विभाग गट ‘क’ आणि गट ‘ड’ भरतीसाठी TCS व IBPS पॅटर्ननुसार महत्त्वाचे 3 पुस्तकं पाहणार आहोत.
1) आरोग्य विभाग भरती संपूर्ण मार्गदर्शन :
सिद्धेश्वर हाडबे सर लिखित आणि भारतीय प्रकाशन,पुणे यांच्या मार्फत प्रकाशित असणारे हे पुस्तक आरोग्य विभाग भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे. हे पुस्तक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आधी परिचारिका, विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ लिपिक, औषध निर्माता अशा सर्व पदांकरिता उपयुक्त आहे.
वैशिष्ट्ये : या पुस्तकात सर्व Updated चालू घडामोडी सहित महत्त्वाचे प्रश्नसंच तसेच तांत्रिक माहिती, मराठी, अंकगणित, सामान्य ज्ञान इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी अशा सर्व विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये कोविड 19 आजारावर महत्त्वाचे माहिती आणि प्रश्नसंच घेतलेले आहेत.
🟢 आरोग्य विभागाच्या सर्व पद भरतीसाठी परिपूर्ण गाईड
🟢 आरोग्य विभाग संपूर्ण सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश
🟢 आरोग्य खात्याशी संबंधित योजनांचा समावेश
🟢 आरोग्य विभाग पद भरतीसाठी अत्यावश्यक संभाव्य आणि सराव प्रश्नांचा समावेश देखील या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
2) TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलायनर स्वरूपात)
विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित आणि मेघदूत हर्लेकर यांच्यामार्फत लिखित हे पुस्तक सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकते. हे पुस्तक तलाठी भरती, नगरपरिषद, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामसेवक, कृषी सेवक, पशुसंवर्धन, रचना सहाय्यक, महानगरपालिका, सहकार विभाग, व अर्थ व सांख्यिकी विभाग, पुरवठा विभाग तसेच TCS IBPS मार्फत होणाऱ्या इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक आहे.
वैशिष्ट्ये : TCS IBPS ने 2022-23 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेतील राज्यघटना, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण संगणक, स्टॅटिक Gk, RTI & RTS या विषयांचे घटक निहाय वर्गीकरण या पुस्तकात घेतलेले आहे.
TCS IBPS 2023-24 मध्ये ज्या परीक्षा घेणार आहेत त्या प्रत्येक परीक्षेत GS मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी सर्वोत्तम पुस्तक ठरू शकते.
TCS IBPS ने जुलै 2023 पर्यंत घेतलेल्या 21 प्रकारच्या परीक्षेतील जवळपास 400+ प्रश्नपत्रिकातील GS च्या प्रश्नांचा समावेश वन लाइनर पद्धतीने केला आहे.
🟢 GS मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यावश्यक पुस्तक
🟢 TCS च्या जुलै 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश
हे पण वाचा : पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती
3) आरोग्य भरती तांत्रिक डायरी :
लेखक विकास शिंदाडकर सर व सचिन कुरुंद सर यांच्या हस्ते लिखित व विजयपथ पब्लिकेशन L,पुणे यांच्यामार्फत प्रकाशित असणारे हे पुस्तक, जे की 100% TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. ते पुस्तक सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड भरतीसाठी तसेच जेवढे 17 ते 18 पद आहेत, जे आरोग्य विभागामार्फत भरले जातात अशा सर्व भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे पुस्तक ठरलेले आहे.
वैशिष्ट्ये : TCS IBPS मार्फत होणाऱ्या आरोग्य सेवक पुरुष, महिला तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतर सर्वच पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पुस्तक आहे.
9 मे 2023 चा नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना.
आरोग्य विभागाच्या मागील परीक्षेत सर्वच्या सर्व तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातून आलेले आहेत .
Fast Revision साठी नवीन पद्धतीचे 5200+ तांत्रिक मुलांना प्रश्न या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार असणारे हे पुस्तक नक्की अभ्यासा.
निष्कर्ष :
तर मित्रांनो आज आपण या आर्टिकलमध्ये जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभाग भरती आणि या भर्त्यांसाठी महत्त्वाचे असणारे जे काही पुस्तक आहेत ते आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत.
आतापर्यंत ZP Bharti Book List मधील परीक्षेला विचारण्यात आलेले प्रश्नोत्तरे