Maharashtra Police Bharti 2024 Questions 06 | Police Bharti 2023 च्या छ.संभाजीनगर लोहमार्ग पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. ‘अन्वय’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) आज्ञा
2) उपकारी
3) फायदेशीर
4) संयोग
उत्तर : 4) संयोग
स्पष्टीकरण : अन्वय या शब्दाचा समानार्थी संयोग हा आहे.
आज्ञा =आदेश ,हुकूम.
फायदेशीर= लाभदायक ,फलदायक, फलदायी.
प्रश्न 2. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना ………….. असे म्हणतात.
1) शब्दयोगी अव्यय
2) उभयान्वयी अव्यय
3) समास
4) संधी
उत्तर : 2) उभयान्वयी अव्यय
प्रश्न 3. एक रुपया म्हणजे शंभर पैसे .यातील’ म्हणजे’ हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?
1) स्वरूप बोधक
2) कारण बोधक
3) उद्देश बोधक
4) संकेत बोधक
उत्तर : 1) स्वरूप बोधक
स्पष्टीकरण : स्वरूपबोधक- म्हणुन, म्हणजे, की, जे.
कारणबोधक- कारण,का, की
उद्देशबोधक- म्हणून ,सबब ,यास्तव ,कारण- की
संकेतबोधक- जर -तर,की , तर.
प्रश्न 4. ‘अंमलबजावणी ‘हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन भाषा मिळून बनला आहे ?
1) फारसी +फारसी
2) मराठी+ मराठी
3) मराठी +फारसी
4) फारसी + मराठी
उत्तर : 4) फारसी + मराठी
स्पष्टीकरण : अंमलबजावणी=फारसी + मराठी
प्रश्न 5. पार्वतीने निळकंठास वरले .हा कोणता समास आहे ?
1) बहुव्रीहि समास
2) तत्पुरुष समास
3) अव्ययीभाव समास
4) द्वंद्व समास
उत्तर : 1) बहुव्रीहि समास
स्पष्टीकरण : ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास म्हणतात. उदा. ज्याचा कंठ निळा आहे असा तो (महादेव)
प्रश्न 6. वाक्याचा प्रकार ओळखा. आशिषला कष्टाने मिळवलेली भाकर हवी.
1) संयुक्त वाक्य
2) केवल वाक्य
3) आज्ञार्थी वाक्य
4) मिश्र वाक्य
उत्तर : 2) केवल वाक्य
स्पष्टीकरण : ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास केवल वाक्य म्हणतात.
प्रश्न 7. ‘सर्वांना समज दिली जाईल’या विधानाचा प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग
2) समापन कर्मणी
3) प्रयोग संकर प्रयोग
4) नवीन कर्मणी प्रयोग
उत्तर : 4) नवीन कर्मणी प्रयोग
स्पष्टीकरण : प्रश्न प्रश्नातील वाक्यात जरी करता स्पष्ट नसला ती कोणाकडून तरी क्रिया केली जाईल म्हणजेच कोणाकडून तरी सर्वांना समज दिली जाईल.
कर्त्याला ‘कडून’ प्रत्येक लागल्यावर नवीन कर्मणी प्रयोग होतो.
प्रश्न 8. पुढील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा. देव देवाचे मंदिर ! आत आत्मा परमेश्वर!
1) अनन्वय
2) व्यतिरेक
3) रूपक
4) अनुप्रास
उत्तर : 3) रूपक
स्पष्टीकरण : जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.
प्रश्न 9. मल्लीनाथी म्हणजे काय ?
1) एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका
2) स्वतःवर केलेली टीका
3) दुसऱ्यांच्या डोक्यावर चुकांचे खापर फोडणे
4) दुसऱ्यांची चूक स्वतःवर ओढून घेणे
उत्तर : 1) एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका
स्पष्टीकरण : मल्लीनाथी म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका.
प्रश्न 10. रामने पुस्तक कोठे ठेवले ? वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती
1) प्रथम
2) तृतीया
3) पंचमी
4) सप्तमी
उत्तर : 2) तृतीया
स्पष्टीकरण : प्रथमा -विभक्ती नसते
तृतीया – ने, ए, शी ! नी,ही, शी, ई.
प्रश्न 11. मधु लाडू खात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे.
1) रिती वर्तमान काळ
2) रीती भविष्यकाळ
3) पूर्ण भूतकाळ
4) रिती भूतकाळ
उत्तर : 4) रिती भूतकाळ
स्पष्टीकरण : वाक्यात क्रियापद ‘खात असे’ हे आहे. यावरून भूतकाळात क्रिया नियमित घडत होती. म्हणून काळ रीती भूतकाळ होईल.
प्रश्न 12. विसंगत पर्याय निवडा.
1) आनंदाला पारा न उरणे.
2) आभाळ ठेंगणे होणे.
3) आकाशाला गवसणी घालणे.
4) आनंद गगनात मावेनासा होणे.
उत्तर : 2) आभाळ ठेंगणे होणे.
प्रश्न 13. ‘दिवसरात्र पाहुण्यांची सरबराई करून आई अगदी थकून गेली होती.’ या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा.
1) गलितगात्र होणे
2) जिव्हारी होणे
3) व्यासंग होणे
4) चतुर्भुज होणे
उत्तर : 1) गलितगात्र होणे
स्पष्टीकरण : वाक्यातील थकून गेली होती या शब्दसमूहासाठी गलितगात्र होणे हा वाक्यप्रचार योग्य आहे.
प्रश्न 14. ‘डोळे फिरणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
1) चक्कर येणे
2) संतापने
3) आश्चर्यचकित होणे
4) अधिकाराने अंगी मग्रुरी येणे
उत्तर : 1) चक्कर येणे
स्पष्टीकरण : डोळे फिरणे – चक्कर येणे
प्रश्न 15. जोंधळ्याला चांदणे लखडून जाते -या विधानाची शब्दशक्ती ओळखा.
1) सारोपा गौनी लक्षणा
2) साध्यवासना गौनी लक्षणा
3) उपादान शुद्ध लक्षणा
4) लक्षण लक्षणा शुद्ध लक्षणा
उत्तर : 2) साध्यवासना गौनी लक्षणा
स्पष्टीकरण : अध्यवासन करणे म्हणजे नाहीसे करणे.
प्रश्न 16. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ……… म्हणतात.
1) ठकी
2) कालीचंडिका
3) गंगावती
4) चंपावती
उत्तर : 1) ठकी
स्पष्टीकरण : महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बाहुलीला ठकी असे म्हणतात.
ठकी हे लहान मुलींचे खेळणे आहे.
कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवतात.
प्रश्न 17. जा, ये, उठ, कर,बस, या मूळ धातूंना …………..म्हणतात.
1) अभयविध धातू
2) सिद्ध धातू
3) साधित धातू
4) अकर्मक धातू
उत्तर : 2) सिद्ध धातू
प्रश्न 18. डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात………… या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
1) चेन्नई
2) वेल्लोर
3) हैदराबाद
4) मुंबई
उत्तर : 2) वेल्लोर
स्पष्टीकरण : भारतात वेल्लोर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया डॉक्टर.एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
प्रश्न 19. महाबळेश्वर जवळील भिलार हे ……….. गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
1) पुस्तकांचे गाव
2) वनस्पतींचे गाव
3) आंब्याचे गाव
4) किल्ल्यांचे गाव
उत्तर : 1) पुस्तकांचे गाव
प्रश्न 20. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी ,मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण ?
1) प्र .के. अत्रे
2) रा.र.गडकरी
3) पु ल देशपांडे
4) वि.वा.शिरवाडकर
उत्तर : 1) प्र .के. अत्रे
स्पष्टीकरण : प्र .के. अत्रे यांची काही प्रसिद्ध नाटके –
तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरुची मावशी, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी.
प्रश्न 21. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?
1) अजित डोवाल
2) अमित शहा
3) कॅप्टन अमरेंद्र सिंह
4) के.विजयकुमार
उत्तर : 1) अजित डोवाल
स्पष्टीकरण : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहेत.
भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे ब्रजेश मिश्रा होते.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, राजेंद्र खन्ना ,विक्रम मिस्त्री ,पंकज कुमार सिंह हे आहेत.
प्रश्न 22. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
1) अनाथ आश्रम
2) आर्य समाज
3) रयत शिक्षण संस्था
4) विवेकानंद शिक्षण संस्था
उत्तर : 3) रयत शिक्षण संस्था
स्पष्टीकरण : रयत शिक्षण संस्था स्थापना (1919) कर्मवीर भाऊराव पाटील कराड जवळील ‘ काले’ गावात.
कर्मवीर भाऊराव पाटील जन्म 22 सप्टेंबर 1887
कुंभोज (कोल्हापूर)
मुष्टीफंड योजना सुरू केली.
दुधगाव विद्यार्थी आश्रम -1909
प्रश्न 23. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) आर्थिक धोरण
2) हरितक्रांती
3) धवल क्रांती
4) शैक्षणिक धोरण
उत्तर : 3) धवल क्रांती
स्पष्टीकरण : वर्गीस कुरियन- धवलक्रांतीचे जनक
धवलक्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे.
ऑपरेशन फ्लड- दूध उत्पादन वाढून दुधाचा महापूर यावा ही संकल्पना.
प्रश्न 24. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) ठाणे
2) पालघर
3) रायगड
4) सुरत
उत्तर : 3) रायगड
स्पष्टीकरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे.
प्रश्न 25. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
1) 7 जून
2) 6 जून
3) 5 जून
4) 8 जून
उत्तर : 3) 5 जून
स्पष्टीकरण : जागतिक पर्यावरण दिन 5 जून या दिवशी साजरा केला जातो.