Maharashtra Police Bharti 2024 Questions 01 | Police Bharti 2023 च्या अमरावती जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. भौतिक शास्त्रामध्ये न्यूटन हे ………. चे एकक आहे.
1) दाब
2) बल
3) ऊर्जा
4) संवेग
उत्तर : 2) बल
स्पष्टीकरण : भौतिक शास्त्रामध्ये न्यूटन हे बल चे एकक आहे. बल ही सदिश राशी आहे. सूत्र- बल = वस्तूमान एक्स ( F=m x a)
प्रश्न 2. खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही ?
1) शहानुर
2) पेढे
3) बेंबळा
4) मोर्णा
उत्तर : 4) मोर्णा
स्पष्टीकरण : मोरणा नदी ही पूर्ण नदीची उपनदी आहे. ही नदी अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून वाहते. शहानुर ,पेढी ,बेंबळा या नद्या अमरावती जिल्ह्यातून वाहतात.
अमरावती जिल्ह्यात 14 तालुके आहेत. या जिल्ह्यात चिखलदरा हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे.रिद्धपूर हे महानुभव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ आहे.
प्रश्न 3. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?
1) चंद्रपूर
2) बुलढाणा
3) नाशिक
4) अकोला
उत्तर : 1) चंद्रपूर
स्पष्टीकरण : समृद्धी महामार्ग चंद्रपूर या जिल्ह्यातून जात नाही.
नाव: हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग.
एकूण लांबी- 701 कि.मी.
पहिला टप्पा -नागपूर ते शिर्डी -530 कि.मी.
जोडलेले जिल्हे- 10 प्रत्यक्ष ,14 अप्रत्यक्ष
प्रश्न 4. नुकताच खालीलपैकी कोणत्या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहितीपटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
1) द एलिफंट बॉय
2) द एलिफंट व्हिस्पर्स
3) द एलिफंट हंटर
4) यापैकी नाही
उत्तर : 2) द एलिफंट व्हिस्पर्स
स्पष्टीकरण : 95 वे ऑस्कर पुरस्कार लॉस एंजलिस येथे आयोजित करण्यात आला. दि एलिफंट व्हिस्पर्स या सर्वोत्कृष्ट लघुश्रेणी माहिती पटास ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऑस्कर म्हणजेच अकादमी पुरस्कार हे जगातील सर्वात मोठे चित्रपट पुरस्कार आहे.
प्रश्न 5. पोलीस स्मृतिदिन हा ………..या दिवशी असतो.
1) 21 ऑगस्ट
2) 21 सप्टेंबर
3) 21 ऑक्टोबर
4) 21 नोव्हेंबर
उत्तर : 3) 21 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : पोलीस स्मृतिदिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी असतो. या दिवशी पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.
प्रश्न 6. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण………… या वायूचे आहे .
1) नायट्रोजन
2) ऑक्सिजन
3) कार्बन डायऑक्साइड
4) हायड्रोजन
उत्तर : 1) नायट्रोजन
स्पष्टीकरण : पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन या वायूचे आहे.
वायूचे अंदाजे प्रमाण खालील प्रमाणे.
नायट्रोजन 78%
ऑक्सीजन 21%
अरगॉन 0.93%
कार्बन डायऑक्साइड 0.04%
प्रश्न 7. भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा……… ची संख्या दर्शवितो.
1) इलेक्ट्रॉन
2) न्यूट्रॉन
3) इलेक्ट्रॉन+न्यूट्रॉन
4) यापैकी नाही
उत्तर : 3) इलेक्ट्रॉन+न्यूट्रॉन
स्पष्टीकरण : भौतिक शास्त्रामध्ये मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉन + न्यूट्रॉन दर्शवितो. सांकेतिक अक्षर – Z .
उदा .कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक 6 आहे.
प्रश्न 8. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळत नाही ?
1) जीवनसत्व अ
2) जीवनसत्व ब
3) जीवनसत्व ड
4) जीवनसत्व क
उत्तर : 2) जीवनसत्व ब
स्पष्टीकरण : जीवनसत्व ब हे मेदात न विरघळणारे जीवनसत्व आहे. मेदात विरघळणारे जीवनसत्त्वे -अ,ड,के, ई. पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे- ब, क. जीवनसत्व ‘के’रक्त गोठण्यास मदत करते.
प्रश्न 9. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग करण्यात येतो ?
1) अल्टीमीटर
2) थर्मामीटर
3) बॅरोमीटर
4) युडोमीटर
उत्तर : 3) बॅरोमीटर
स्पष्टीकरण : वातावरणीय दाब मोजण्याकरिता बॅरोमीटर चा वापर करतात.
अल्टीमीटर – विमानातील उंची
थर्मामीटर – तापमापक
सिस्मोग्राफ – भूकंपमापी
ऑडिओमीटर – ध्वनीमापक
प्रश्न 10. विसंगत घटक ओळखा.
1) मीटर
2) यार्ड
3) इंच
4) एकर
उत्तर : 4) एकर
स्पष्टीकरण : मीटर, यार्ड ,इंच हे लांबीचे एकक आहेत परंतु’ एकर ‘हे मोठे क्षेत्रफळाचे एकक आहे म्हणून एकर हे विसंगत आहे.
प्रश्न 11. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणासंदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1) महाबळेश्वर- सातारा
2) माथेरान – पुणे
3) भंडारदरा -अहमदनगर
4) म्हैसमाळ- छत्रपती संभाजीनगर
उत्तर : 2) माथेरान – पुणे
स्पष्टीकरण : थंड हवेचे ठिकाण व जिल्हा खालील प्रमाणे
महाबळेश्वर – सातारा
माथेरान- रायगड
भंडारदरा- अहमदनगर
म्हैसमाळ- छत्रपती संभाजीनगर
चिखलदरा -अमरावती
थंड हवेचे ठिकाण व जिल्हा
लोणावळा- पुणे
खंडाळा -पुणे
पाचगणी -सातारा
आंबोली -सिंधुदुर्ग
प्रश्न 12. टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) बुलढाणा
2) वर्धा
3) यवतमाळ
4) अकोला
उत्तर : 3) यवतमाळ
स्पष्टीकरण : टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात आहे.
अभयारण्य व जिल्हा पुढीलप्रमाणे
अंधारी -चंद्रपूर
भामरागड -गडचिरोली
बोर -वर्धा
चपराळा- गडचिरोली
माळढोक -सोलापूर -अहमदनगर
मेळघाट -अमरावती.
प्रश्न 13. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1) गोदावरी – गंगापूर
2) भीमा -उजनी
3) गोदावरी -जायकवाडी
4) भीमा – खडकवासला
उत्तर : 4) भीमा – खडकवासला
स्पष्टीकरण : खडकवासला हे धरण मुठा नदीवर आहे.
नदी व असलेली धरणे खालील प्रमाणे
गोदावरी -गंगापूर ,जायकवाडी
भीमा- उजनी
कोयना – कोयना
कृष्णा -नागार्जुन सागर
तापी- उकाई धरण
नर्मदा- सरदार सरोवर.
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
प्रश्न 14. कापूस या पिकासाठी………….. मृदा उपयुक्त असते.
1) रेगुर मृदा
2) जांभी मृदा
3) तांबडी मृदा
4) गाळाची मृदा
उत्तर : 1) रेगुर मृदा
स्पष्टीकरण : कापूस या पिकासाठी रेगूर मृदा उपयुक्त असते. महाराष्ट्रात 80 टक्के पेक्षा जास्त बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते.
मृदेचे पाच प्रकार : काळी मृदा ,जांभी मृदा, तांबडी मृदा ,गाळाची मृदा, चिकन मृदा. काळया मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात.
प्रश्न 15. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) मध्यप्रदेश
4) झारखंड
उत्तर : 1) महाराष्ट्र
स्पष्टीकरण : कर्कवृत्त हे महाराष्ट्र राज्यातून जात नाही. कर्कवृत्त हे आठ राज्यातून जाते ते पुढील प्रमाणे – राजस्थान, मध्यप्रदेश ,मिझोराम, पश्चिम बंगाल ,गुजरात, छत्तीसगड, त्रिपुरा ,झारखंड.
प्रश्न 16. भारतात सध्या ……. राज्य व ……. केंद्रशासित प्रदेश आहेत.
1) 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश
2) 27 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश
3) 28 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश
4) 27 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश
उत्तर : 1) 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश
स्पष्टीकरण : भारतामध्ये सध्या 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रशासकाची नेमणूक करतात. जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करून 9 केंद्रशासित प्रदेश झाले होते. दमन -दिव आणि दादरा- नगर हवेली यांच्या विलीनीकरणमुळे पुन्हा ती संख्या 8 झाली आहे.
प्रश्न 17. भारतीय राज्यघटना ……….. या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे.
1) 21 डिसेंबर 1948
2) 26 नोव्हेंबर 1949
3) 26 जानेवारी 1948
4) 26 जानेवारी 1950
उत्तर : 2) 26 नोव्हेंबर 1949
स्पष्टीकरण : भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले.
प्रश्न 18. नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत ?
1) कलम 51
2) कलम 51अ
3) कलम 52
4) कलम 52अ
उत्तर : 2) कलम 51अ
स्पष्टीकरण : नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 51अ मध्ये नमूद आहेत. हा भाग 1976 मध्ये 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडला गेला.
मूलतः 10 कर्तव्य होते. 86 वी घटना दुरुस्ती कायदा 2002 नंतर 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. हे वैशिष्ट्य युएसएसआर च्या संविधानातून घेतली आहे.
प्रश्न 19. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही ?
1) केंद्रीय लोकसेवा आयोग
2) भारतीय निवडणूक आयोग
3) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
4) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
उत्तर : 4) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
स्पष्टीकरण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ( NHRC) ची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 च्या कायद्यांतर्गत करण्यात आली. हा एक बहु सदस्य आयोग आहे. यात एक अध्यक्ष व इतर चार सदस्य असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग, भारतीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांना घटनात्मक दर्जा प्राप्त आहे.
प्रश्न 20. स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहाससंदर्भात ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक’ असे कोणाला संबोधले जाते ?
1) लॉर्ड रिपन
2) लॉर्ड कॅनिंग
3) लॉर्ड कर्झन
4) लॉर्ड वेलस्ली
उत्तर : 1) लॉर्ड रिपन
स्पष्टीकरण : लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानले जाते. 1832 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात आली. लॉर्ड रिपनच्या अंतर्गत इतर सुधारणा आणि घटना कामगार परिस्थिती सुधारण्यासाठी 1881 मध्ये पहिला कारखाना कायदा.
प्रश्न 21. दादाभाई नौरोजी हे खालीलपैकी कोणत्या संस्थेची निगडित नव्हते ?
1) बॉम्बे असोसिएशन
2) ईस्ट इंडिया असोसिएशन
3) ज्ञान प्रसारक मंडळी
4) इंडियन इंडिपेंडन्स लीग
उत्तर : 4) इंडियन इंडिपेंडन्स लीग
स्पष्टीकरण : दादाभाई नौरोजी हे इंडियन इंडिपेंडेंस लीग या संस्थेची निगडित नव्हते. ते बॉम्बे असोसिएशन ,ईस्ट इंडिया असोसिएशन, ज्ञान प्रसारक मंडळी या संस्थेची निगडित होते. त्यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती होते.
प्रश्न 22. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण ?
1) लोकमान्य टिळक
2) साने गुरुजी
3) विनोबा भावे
4) बाबा आमटे
उत्तर : 3) विनोबा भावे
स्पष्टीकरण : विनोबा भावे हे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहेत. ही चळवळ 1951 मध्ये तेलंगणा येथील पोचमपल्ली येथे सुरुवात झाली. श्रीमंत शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा1/6 वा भाग दान करण्याची मागणी केली होती.
प्रश्न 23. भारताच्या हरितक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ?
1) सी. रंगराजन
2) एम. एस. स्वामीनाथन
3) एस. राधाकृष्णन
4) यापैकी नाही
उत्तर : 2) एम. एस. स्वामीनाथन
स्पष्टीकरण : भारताच्या हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना संबोधले जाते. गहू उत्पादन वाढ ही हरितक्रांतीची उपलब्धी होती.
प्रश्न 24. महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) महात्मा फुले
2) महादेव गोविंद रानडे
3) विठ्ठल रामजी शिंदे
4) धोंडो केशव कर्वे
उत्तर : 4) धोंडो केशव कर्वे
स्पष्टीकरण : महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली. भारत सरकारने 1958 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.धोंडो केशव कर्वे यांनी ‘निष्काम कर्म मठाची’ स्थापना 1910 साली केली.
प्रश्न 25. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
2) लाला लजपतराय
3) सार्वजनिक काका
4) नारायण.मे .लोखंडे
उत्तर : 1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण : स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 1937 च्या प्रांतीय निवडणुकीत स्वतंत्र कामगार पक्षाने 17 पैकी 15 जागा जिंकल्या.