Maharashtra Police Bharti 2024 Questions 02 | Police Bharti 2023 च्या अमरावती जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. मराठी भाषेमध्ये ‘आणि,व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः ………… म्हणून वापरले जातात.
1) उभयान्वयी अव्यय
2) सर्वनाम
3) केवलप्रयोगी अव्यय
4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर : 1) उभयान्वयी अव्यय
स्पष्टीकरण : मराठी भाषांमध्ये आणि ,व ,किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात.
दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात- प्रधानतत्व सुचक उभयानवी अव्यय व गौणतत्वसुचक उभयान्वयी अव्यय.
संयुक्त वाक्य प्रधानतत्व सुचक उभयान्वयी अव्यय शब्द जोडून बनलेले असते.
मिश्र वाक्य गौणतत्त्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे शब्द जोडून बनलेले असते.
प्रश्न 2. ‘बाळ एवढा चिवडा खाऊन टाक’. या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा.
1) खा
2) खाऊन
3) खाऊन टाक
4) यापैकी नाही
उत्तर : 1) खा
स्पष्टीकरण : वाक्यातील क्रियापद ‘खाऊन टाक’ हे आहे. खाऊन हे शब्द मुख्य क्रियापद तर ‘टाक’ हे शब्द सहाय्यकारी क्रियापद आहे. ‘खाऊन’ हे शब्द ‘खा’या मूळ धातूपासून तयार झाले आहे.
प्रश्न 3. ‘संध्या सुरेल गाणे गाते’. या वाक्याचा प्रयोग कोणता ?
1) कर्मणी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) कर्तरी प्रयोग
4) यापैकी नाही
उत्तर : 3) कर्तरी प्रयोग
स्पष्टीकरण : संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे.
कर्तरी प्रयोग- वाक्यातील क्रियापद कर्त्याचा लिंग ,वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगात करता नेहमी प्रथमांतच असतो व कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते.
प्रश्न 4. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ?
1) देवपूजा
2) प्रतिदिन
3) साखरभात
4) लक्ष्मीकांत
उत्तर : 2) प्रतिदिन
स्पष्टीकरण : अव्ययीभाव समास – ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्यय प्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असे म्हणतात.
अव्ययीभाव समास -आ,यथा,प्रति, हर ,दर ,गैर, बिन ,बे, यासारखे उपसर्ग लागून शब्द तयार होतात.
प्रतिदिन हा शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.
प्रश्न 5. ‘मी आज शाळेत जाणार आहे ‘या वाक्याचा प्रकार कोणता ?
1) प्रश्नार्थी वाक्य
2) उद्गारार्थी वाक्य
3) विधानार्थी वाक्य
4) नकारार्थी वाक्य
उत्तर : 3) विधानार्थी वाक्य
स्पष्टीकरण : ‘मी आज शाळेत जाणार आहे’. या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे.
विधानार्थी वाक्य- ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवट पूर्णविराम आणि होतो ,ते वाक्य विधानार्थी वाक्य असते.
प्रश्न 6. मराठी वर्णमालेत एकूण ………… वर्ण आहेत.
1) 40
2) 52
3) 60
3) यापैकी नाही
उत्तर : 2) 52
स्पष्टीकरण : मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण . मराठीत एकूण बारा स्वर आहेत.
प्रश्न 7. योग्य पर्याय निवडा: कवी + ईश्वर = ?
1) कविश्वर
2) कवीश्वर
3) कवेश्वर
4) यापैकी नाही
उत्तर : 2) कवीश्वर
स्पष्टीकरण : कवी+ ईश्वर= कवीश्वर
दीर्घत्व संधी- दोन स्वजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ स्वर येतो त्यास दीर्घत्व संधी असे म्हणतात.
प्रश्न 8. ‘विंचवाचे बिऱ्हाड’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
1) शत्रूचे सामान सोबत घेऊन फिरणारा
2) मागेपुढे कोणी आप्त नसलेला
3) वारंवार संकट ओढवून घेणारा
4) यापैकी नाही.
उत्तर : 2) मागेपुढे कोणी आप्त नसलेला
स्पष्टीकरण : विंचवाचे बिऱ्हाड -या शब्दाचा योग्य अर्थ मागेपुढे कोणी आप्त नसलेला.
काही वाक्यप्रचार खालील प्रमाणे
आभाळ फाटणे- सर्व बाजूंनी संकटे येणे .
अडेलतट्टू – दुराग्रही ,हेकेखोर, आडून बसणारा.
काळीज फाटणे- भीतीने थरकाप उडणे.
घबाड सापडणे- अचानक लाभ होणे
घोडे मारणे- नुकसान टाळणे
खडे फोडणे- दोष देणे.
प्रश्न 9. ‘अडचण’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
1) विघ्न
2) नुकसान
3) आपत्ती
4) संकट
उत्तर : 2) नुकसान
स्पष्टीकरण : नुकसान हा शब्द अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे
तगडा=सशक्त बळकट
वाडा =मेळ,ताह
झेंडा= निशान ,पताका, ध्वज.
जहाल =तीव्र ,तीक्ष्ण ,तापट, कडक .
तपास =चौकशी ,शोध.
प्रश्न 10. ‘पृथ्वी’ या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखा.
1) दामिनी
2) सरोज
3) युक्ती
4) वसुंधरा
उत्तर : 4) वसुंधरा
स्पष्टीकरण : पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा हा होय.
काही महत्त्वाचे समानार्थी शब्द.
दामिनी =चपाल ,चंचला.
सरोज= कमळ ,अंबुज, अब्ज.
युक्ती= विचार , शकल
एकला =एकाकी, एकटा.
औषध= दवा, इलाज, उपाय.
कच= माघार ,अडचण ,केस.
कसर= उणीव ,कपड्यांना लागणारी कीड.
प्रश्न 11. ‘कल्पित’ या शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा.
1) निंदा
2) वास्तविक
3) घमेंड
4) निर्बुद्ध
उत्तर : 2) वास्तविक
स्पष्टीकरण : कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वास्तविक हा होय.
काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द.
निंदा xस्तुती
घमेंडx विनम्रता
सतेजx निस्तेज
हर्षx खेद
चवx बेचव
वास्तविक xकल्पित
निर्बुद्धx बुद्धिमान
मान xअपमान
प्रश्न 12. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा
1) रोष x आनंद
2) रोख x उधार
3) रंक x गरीब
4) रुद्र x सौम्य
उत्तर : 3) रंक x गरीब
प्रश्न 13. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
1) परिस्थितीती प्राप्त होताच माणसाला बळ मिळते.
2) आजारी असताना पांघरून घेऊन झोपावे.
3) आपली ऐपत पाहून वागावे.
4) अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईट होतो.
उत्तर : 3) आपली ऐपत पाहून वागावे.
स्पष्टीकरण : अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ -आपली ऐपत पाहून वागावे.
आपला हात जगन्नाथ -आपल्याच हाताने एखादी गोष्ट भरपूर होत राहते.
आधीच तारे आणि त्यात शिरले वारे -आधीच मर्कट आणि त्यात त्याने मद्यपान करावे तसे होणे.
आपलेच दात आपलेच ओठ -आपल्याच माणसांनी केलेल्या चुका लोकांत स्पष्ट करून दाखविता येत नाहीत.
इकडे आड तिकडे विहीर -दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती असने.
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
प्रश्न 14. ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.
1) डोळ्यात तेल आणि कानात फुंकर.
2) आपलेच दात आणि आपलेच ओठ.
3) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
4) पालथ्या घड्यावर पाणी.
उत्तर : 1) डोळ्यात तेल आणि कानात फुंकर.
स्पष्टीकरण : आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी -या म्हणीला समानार्थी म्हण डोळ्यात तेल आणि कानात फुंकर.
या म्हणीचा अर्थ गरज असलेल्या माणसाला मदत न करता भलतीकडेच मदत करणे.
प्रश्न 15. खालील पैकी समानार्थी नसलेली / विसंगत म्हण ओळखा.
1) भूषण मारी आणि बटव्यात गारी
2) भपका भारी खिसा खाली
3) एकादशीच्या घरी शिवरात्र
4) घरात नाही कौल रिकामा डौल
उत्तर : 3) एकादशीच्या घरी शिवरात्र
स्पष्टीकरण : भूषण मारी आणि बटव्यात गारी
भपका भारी खिसा खाली
घरात नाही कौल रिकामा डौल
वरील तिन्ही म्हणीचा अर्थ जवळ पैसा नसताना कोरडी ऐट केली तर प्रसंगी मानहानीची वेळ येते. या अर्थाचा आहेत.
एकादशीच्या घरी शिवरात्र – संकटात आणखी संकट येणे ही म्हण वेगळ्या अर्थाची आहे.
प्रश्न 16. सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. दररोज
1) विशेषण
2) क्रियाविशेषण अव्यय
3) उभयान्वयी अव्यय
4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर : 2) क्रियाविशेषण अव्यय
स्पष्टीकरण : दररोज या शब्दाची जात क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय-ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शविली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
प्रश्न 17. ‘मिताहारी’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
1) मोजका आहार नेमाने घेणारा.
2) मोजका हार घालणारा.
3) मोजके शब्द बोलणारा.
4) मोजके पैसे खर्च करणारा.
उत्तर : 1) मोजका आहार नेमाने घेणारा.
स्पष्टीकरण : मिताहारी- मोजका आहार नेमाने घेणारा.
मितभाषी-मोजके शब्द बोलणारा.
अनाथ- कोणाचाही आधार नाही असा
अनुज- मागून जन्मलेला
अन्नछत्र -मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण
कृतघ्न -केलेले उपकार विसरणारा.
प्रश्न 18. ‘विदुषी’ या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
1) सर्कशीत खेळ करणारी स्त्री
2) विद्वान स्त्री
3) समाजाची सेवा करणारी
4) यापैकी नाही
उत्तर : 2) विद्वान स्त्री
स्पष्टीकरण : विदुषी – विद्वान स्त्री
हंस- हंसी
बेडूक – बेडकी
वानर- वानरी
भगवान – भगवती
विद्वान- विदुषी
खोंड- कालवड
प्रश्न 19. अभिनव भारत ( यंग इंडिया) संघटनेचे मुख्यालय ……….. होते.
1) पुणे
2) नाशिक
3) नागपुर
4) मुंबई
उत्तर : 2) नाशिक
स्पष्टीकरण : अभिनव भारत संघटनेची स्थापना 1904 ला झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या संघटनेची स्थापना नाशिक येथे केली. मित्रमेळाचे रूपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले.
प्रश्न 20. आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ?
1) राजा राम मोहन रॉय
2) महात्मा फुले
3) दादाभाई नौरोजी
4) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
उत्तर : 1) राजा राम मोहन रॉय
स्पष्टीकरण : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय. जन्म 22 मे 1772
22 मे 2022 रोजी 250 वी जयंती साजरी. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
प्रश्न 21. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली ?
1) डायर कमिशन
2) हंटर कमिशन
3) रौलट कमिशन
4) ओडवायर कमिशन
उत्तर : 2) हंटर कमिशन
स्पष्टीकरण : 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी हंटर कमिशन ने केली. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919. हंटर कमिशन 1919 अध्यक्ष विल्यम हंटर 28 मे 1920 रोजी अहवाल सादर केला.
प्रश्न 22. भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ?
1) धर्मनिरपेक्ष
2) साम्राज्यवादी
3) लोकशाही
4) प्रजासत्ताक
उत्तर : 2) साम्राज्यवादी
स्पष्टीकरण : भारत हे साम्राज्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही . भारत हे धर्मनिरपेक्ष ,लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी ,सार्वभौम प्रकारचे राष्ट्र आहे.
प्रश्न 23. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
1) लोकसभा
2) विधानसभा
3) विधान परिषद
4) राज्यसभा
उत्तर : 4) राज्यसभा
स्पष्टीकरण : राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभा -विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह.
प्रश्न 24. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) नागपूर
2) ठाणे
3) नाशिक
4) भंडारा
उत्तर : 3) नाशिक
स्पष्टीकरण : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे.
खापरखेडा- नागपूर.
पारस- अकोला.
परळी वैजनाथ – बीड
कोराडी – नागपूर
प्रश्न 25. संत एकनाथ महाराज यांची समाधी स्थळ कोठे आहे ?
1) आळंदी
2) पैठण
3) देहू
4) शेगाव
उत्तर : 2) पैठण
स्पष्टीकरण : एकनाथ महाराज यांची समाधी स्थळ पैठण येथे आहे.
संत गाडगे महाराज- अमरावती.
संत तुकडोजी महाराज -मोझरी अमरावती.
संत तुकाराम- देहू ,पुणे.