Maharashtra Police Bharti Books List : पोलीस भरतीसाठी महत्वाची 5 पुस्तके | Macaish.com

Maharashtra Police Bharti Books List : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्याचे युगात बहुतांश विद्यार्थी वर्ग हा सरळ सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपला वेळ देत आहे. पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती इ. भरतीसाठी मेहनत घेत आहेत.

यातील भरपूर विद्यार्थी अनुभवी असतात म्हणजेच त्यांना परीक्षा कशी असते ?, परीक्षेमध्ये कशा पद्धतीची प्रश्न असतात ?, परीक्षा केंद्र कसे असतात ?, परीक्षेसाठी कोणकोणती पुस्तके वाचावीत ? अशा गोष्टी माहित असणाऱ्या म्हणजेच अनुभवी विद्यार्थी.

Maharashtra Police Bharti Books List
Maharashtra Police Bharti Books List

 

आणि पहिल्याच वर्षी म्हणजे यंदा बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांची बारावी होऊन सध्या पोलीस भरती 2024 चे परीक्षा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना परीक्षा बाबत मार्गदर्शन करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

तर सर्वात आधी समजावून घेणे गरजेचे आहे, की आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे आहे. त्यापैकी आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे पाच पुस्तके पाहणार आहोत. जे आपल्याला पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.

सर्वात आधी आपण समजावून घेऊ की कोण कोणते विषय कशा पद्धतीने विचारले जातात ?, त्याच हिशोबाने आपण महत्त्वाचा पुस्तके पाहणार आहोत.

पोलीस भरतीचे विषय :

पोलीस भरतीमध्ये मुख्यतः चार विषय असतात.
मराठी व्याकरण
गणित + बुद्धिमत्ता चाचणी
सामान्य ज्ञान
तांत्रिक प्रश्न (पदाकरीता)
सर्वात महत्त्वाची सूचना आहे की पोलीस भरतीमध्ये इंग्रजी हा विषय नसतो.

पोलीस भरतीसाठी महत्त्वाची 5 पुस्तके : Maharashtra Police Bharti Books List

आज आपण पाच महत्त्वाची पुस्तके पाहणार आहोत ज्यामुळे तुमची तयारी एकदम उत्कृष्टरित्या होऊ शकते.

1) 45000+ जम्बो The Smart Book :

सिद्धेश्वर हाडबे लिखित भारतीय प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

Maharashtra Police Bharti Books List

वैशिष्ट्ये – या पुस्तकांमध्ये 2004 ते 2021 या वर्षांमध्ये झालेल्या 350+ प्रश्नपत्रिकांचे विषयनिहाय सूक्ष्म घटकनिहाय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणासह संपूर्ण विश्लेषण देखील देण्यात आले आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा रिविजन ठोकळा आहे हे पुस्तक.


2) पोलीस भरती पेपर सोलुशन :

महाराष्ट्र प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित आणि विठ्ठल बडे सर यांच्यामार्फत लिखित हे पुस्तक आहे. बडे सर स्वतः PSI परीक्षा पास झालेले आहेत म्हणजे अभ्यास कसा करावा हे त्यांना पूर्णपणे माहित आहे.


वैशिष्ट्ये – या पुस्तकात फक्त आणि फक्त 2021 व 2023 अशा दोन वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. 2021 व 2023 मध्ये झालेले सर्व पेपर तेही अपडेटेड चालू घडामोडी सहित आहेत. सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता अशा सर्व घटकातील प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासहित घेतलेले आहेत.

Telegram


3) वाहन चालक भरती :

सचिन कुरुंद सर लिखित तसेच विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्याद्वारे प्रकाशित असलेले हे पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कोणतेही सरळ सेवा भरती म्हटलं की त्यात भरपूर पद हे ड्रायव्हर भरतीचे सुद्धा असतात. आणि पोलीस भरतीमध्ये स्पेशल वाहन चालक भरती असते. त्यासाठी आपण स्पेशल वाहन चालक भरती हे पुस्तक सुचित करत आहोत.


वैशिष्ट्ये – या पुस्तकात वाहतुकीच्या नियमाविषयी अत्यंत साध्या सोप्या भाषेत तसेच सविस्तर सर्वच माहिती दिलेली आहे. 2023 मध्ये झालेली परीक्षा यामध्ये 27 पैकी 22 जिल्ह्यात 20 पैकी 20 प्रश्न आणि पाच जिल्ह्यात 20 पैकी 17 ते 19 प्रश्न याच पुस्तकातून आलेले आहेत. जे जे विद्यार्थी वाहन चालक पदासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे.


4) पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच :

लेखक विठ्ठल राऊतवार सर आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे सर्वात महत्त्वाचे पुस्तक ठरलेला आहे, कारण भरपूर अशी पुस्तके आहेत की, त्यात झालेल्या प्रश्नपत्रिका देतात पण हे माझ्या पाहण्यात आलेले एकमेव पुस्तक आहे की जात जवळपास 50 घटकांवर विशेष Mock प्रश्न घेतलेले आहेत.

वैशिष्ट्ये – या पुस्तकामध्ये भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील जिल्हे, जगाचा भूगोल, कृषी शास्त्र, पर्यावरण, भारताचा इतिहास, राज्यघटना, सामान्य विज्ञान, ग्रामप्रशासन, पंचायतराज, अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान अजून असे भरपूर महत्त्वाच्या घटकावर प्रश्न उत्तरे घेतलेली आहेत सोबतच गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांचा पण समावेश केलेला आहे.


5) पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक :

यशोदा पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत प्रकाशित व प्रा.राजकुमार महारनवर सर यांच्याद्वारे लिखित Best Seller असणारे पोलीस भरती IMP नोट्स हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकेल.


वैशिष्ट्ये – पोलीस शिपाई, एसआरपीएफ पोलीस, चालक पोलीस, रेल्वे पोलीस, कारागृह पोलीस तसेच इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित पोलीस प्रशासनावरील IMP प्रश्नोत्तरे तसेच चालू घडामोडींची एकदम रीतसर मांडणी केलेली आहे. हे पुस्तक रिविजन म्हणून सर्वात उत्तम पुस्तक आहे.

 


 

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price