Maharashtra Police Bharti 2024 Questions 03 | Maharashtra Police Bharti 2023 Question Papers

Maharashtra Police Bharti 2024 Questions 03 | Police Bharti 2023 च्या पुणे लोहमार्ग पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न

Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्‍या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.

Maharashtra Police Bharti 2024 Questions 03
Maharashtra Police Bharti 2024 Questions 03

 

प्रश्न 1. रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) एअर रायफल शूटिंग
2) बिलियर्ड्स
3) क्रिकेट
4) स्विमिंग
उत्तर : 1) एअर रायफल शूटिंग
स्पष्टीकरण : रुद्रांश पाटील हा खेळाडू एअर रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. एअर रायफल शूटिंग चे अन्य खेळाडू.
तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, विजयवीर सिंधू, लक्ष शेरॉन, पृथ्वीराज लेंडायमन हे नेमबाजी खेळाडू आहेत.
नीरज चोप्रा – भालाफेक
मिराबाई चानू – वेटलिफ्टिंग
पी.वी. सिंधू – बॅडमिंटन
बजरंग पुनिया -कुस्ती

प्रश्न 2. केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण आहेत ?
1) नरेंद्र सिंह तोमर
2) अश्विनी वैष्णव
3) अर्जुन मुंडा
4) धर्मेंद्र प्रधान
उत्तर : 2) अश्विनी वैष्णव
स्पष्टीकरण : केंद्रीय रेल्वेमंत्री हे अश्विनी वैष्णव आहेत .
सद्याचे 2023 केंद्रीय मंत्री व खाते.
राजनाथ सिंह – संरक्षण
अमित शहा- गृह , सहकार
नरेंद्र सिंह तोमर- कृषी ,पंचायत राज
निर्मला सीतारमण -अर्थ व कंपनी व्यवहार
नितीन गडकरी -रस्ते व राष्ट्रीय महामार्ग
अनुराग ठाकूर – क्रीडा
स्मृती इराणी- महिला बालविकास
अश्विनी वैष्णव- रेल्वे
एस जयशंकर – परराष्ट्र
गजेंद्र सिंग शेखावत – जलशक्ती

प्रश्न 3. 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
1) भालचंद्र नेमाडे
2) बाबा आढाव
3) डॉ. रवींद्र शोभणे
4) मधुकर सावंत
उत्तर : 3) डॉ. रवींद्र शोभणे
स्पष्टीकरण : अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे हे एक मराठी कथाकार कादंबरीकार लेखक आणि समिक्षक म्हणून प्रसिद्ध .
त्यांची प्रसिद्ध पुस्तके -अनंत जन्मांची गोष्ट ,अश्वमेध, पांढरे हत्ती, गोत्र ,शहामृग.
न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली 1878 पुणे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.

प्रश्न 4. भारताच्या राज्यसभा सभागृहाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
1) जगदीप धनखड
2) मल्लिकार्जुन खरगे
3) ओम बिर्ला
4) थंबी दुराई
उत्तर : 1) जगदीप धनखड
स्पष्टीकरण : भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा सदस्यांचा कालावधी सहा वर्ष मात्र सभापतींचा उपराष्ट्रपती कालावधी पाच वर्ष असतो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात मात्र ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही वेतन दिले जात नाही कलम 69.

प्रश्न 5. खालीलपैकी कुणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला ?
1) भिकूरामजी इदाते
2) रामकृष्ण शिंदे
3) मालतीबाई जाधव
4) राशीद शेख मिया
उत्तर : 1) भिकूरामजी इदाते
स्पष्टीकरण : वंचित घटकांच्या विकासात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल भिकू रामजी इदाते यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Telegram

प्रश्न 6. प्रजासत्ताक दिन 2023 च्या प्रमुख परेडला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असलेले अब्दुल फताह अल सिसी हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
1) लिबिया
2) सुदान
3) इजराइल
4) इजिप्त
उत्तर : 4) इजिप्त
स्पष्टीकरण : इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी यांना 2023 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
सीसी 2014 पासून इजिप्त चे राष्ट्राध्यक्ष आहेत. इजिप्त या देशाची राजधानी कैरो व भाषा अरबी व चलन इजिप्शियन पाउंड आहे. इजिप्त ला नाईल नदीची देणगी म्हणतात.
इजिप्तचे पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे.

प्रश्न 7. केंद्रीय बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोवर ही योजना कशाशी संबंधित आहे ?
1) नदी संवर्धन
2) दूध उत्पादन
3) पाणथळ विकास
4) पाऊस व्यवस्थापन
उत्तर : 3) पाणथळ विकास
स्पष्टीकरण : शहरांमधील पाणथळ जागांचा इष्टतम वापर वाढवण्यासाठी आणि त्यांची जैवविविधता सुधारण्यासाठी भारत सरकारने अमृत धरोहर योजना सुरू केली आहे.
उद्दिष्ट- पाणथळ जमिनींचे इष्टतम वापर करून त्यांचे संवर्धन करणे. ही योजना येत्या तीन वर्षात राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे इको टुरिझम आणि कार्बन स्टॉक वाढेल व स्थानिक समुदायांना त्याचा उत्पन्नात मदत होईल.

प्रश्न 8. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केला आहे ?
1) बलिदान दिवस
2) आजादी दिवस
3) सुभाष दिवस
4) पराक्रम दिवस
उत्तर : 4) पराक्रम दिवस
स्पष्टीकरण : नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897. 23 जानेवारी राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुभाषचंद्र बोस 1938 हरीपुरा येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1939 काँग्रेसचे विचार न पटल्याने त्यांनी स्वतंत्र फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्षाची स्थापना केली . सिंगापूर येथे नेताजींनी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद व अध्यक्षपद स्वीकारले. नेताजींनी भारतीयांना ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा’ असा नारा दिला.

प्रश्न 9. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ?
1) विशेषण
2) नाम
3) क्रियापद
4) अव्यय
उत्तर : 3) क्रियापद
स्पष्टीकरण : क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असते.

प्रश्न 10. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
1) पेन्सिल
2) रुमाल
3) चष्मा
4) मंदिर
उत्तर : 4) मंदिर
स्पष्टीकरण : मराठी मध्ये लिंगाचे प्रमुख तीन प्रकार मानतात
पुल्लिंग – तो
स्त्रीलिंग – ती
नपुसकलिंग -ते

प्रश्न 11. धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो ?
1) सर्वनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम
4) यापैकी नाही
उत्तर : 2) भाववाचक नाम
स्पष्टीकरण : गुणधर्म व भाव दाखविणाऱ्या शब्दाला भाववाचक नाम असे म्हणतात.
भाववाचक नामाचे तीन गट पडतात स्थितीदर्शक, गुणदर्शक ,कृतीदर्शक.
उदा; धैर्य, कीर्ती ,चांगुलपणा, गुलामगिरी.

प्रश्न 12. प्रकाश धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य काय होईल ?
1) प्रकाश हा धीट मुलगा नाही.
2) प्रकाश हा भित्रा मुलगा नाही.
3) प्रकाश हा भित्रा मुलगा आहे.
4) यापैकी नाही
उत्तर : 2) प्रकाश हा भित्रा मुलगा नाही.
स्पष्टीकरण : प्रकाश हा धीट मुलगा आहे -होकारार्थी
प्रकाश हा मित्रा मुलगा नाही- नकारार्थी
उदा. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे -होकारार्थी
अमेरिका गरीब राष्ट्र नाही- नकारार्थी.

प्रश्न 13. नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हणाल ?
1) सनातनी
2) उदयोन्मुख
3) स्वच्छंदी
4) पुरोगामी
उत्तर : 4) पुरोगामी
स्पष्टीकरण : नवीन आधुनिक मते स्वीकारणारा- पुरोगामी
उदयाला येत असलेला- उदयोन्मुख

🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05

प्रश्न 14. ‘अरण्यरुदन’ अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?
1) अरण्यातील चर्चा
2) निरर्थक बडबड
3) निष्काळ- व्यर्थ
4) जोरदार भांडण
उत्तर : 3) निष्काळ- व्यर्थ
स्पष्टीकरण : अभिजात- उच्च दर्जाचा
अमरपट्टा- आश्वासन ,खात्री

प्रश्न 15. ‘क्रोध, चीड, संताप ‘या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो ?
1) रौद्र
2) अद्भुत
3) वीर
4) श्रृंगार
उत्तर :
स्पष्टीकरण : अतिशय क्रोध चीड या भावनेतून रौद्र रस निर्माण होतो.
रसाचे नऊ प्रकार पडतात शृंगार, वीर , करून ,हास्य, रौद्र ,भयानक, बीभस्य, अद्भुत ,शांत.

प्रश्न 16. खालील शब्दसमूहात न बसणारा शब्द ओळखा.
अही, भुजंग ,सर्प, खग
1) अही
2) खग
3) भुजंग
4) सर्प
उत्तर : 2) खग
स्पष्टीकरण : अही – साप, भुजंग ,सर्प.
पक्षी – खग, अंडज,पाखरू विहंग ,विहग.

प्रश्न 17. मुलाने ग्रंथ वाचला हे वाक्य कोणत्या प्रकारातील येईल ?
1) कर्तरी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) यापैकी कोणतेही नाही
4) कर्मणी प्रयोग
उत्तर : 4) कर्मणी प्रयोग
स्पष्टीकरण : कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्मानुसार बदलते.

Telegram

प्रश्न 18. इंदू, सुधाकर, हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत ?
1) सागर
2) चंद्र
3) पृथ्वी
4) नदी
उत्तर : 2) चंद्र
स्पष्टीकरण : हिमांशू ,शशी ,इंदू ,सोम, रजनीश, शशांक, सुधाकर ही चंद्राची समानार्थी शब्द आहेत.
प्रभाकर ,दिवाकर ,मार्तंड, वासरमणी ,चंडाशु ही सूर्याची समानार्थी शब्द आहेत.

प्रश्न 19. राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता ?
1) कर्तरी
2) कर्मणी
3) भावे
4) यापैकी नाही
उत्तर : 2) कर्मणी
स्पष्टीकरण : कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्मानुसार बदलते. कर्मणी प्रयोगात कर्म महत्त्वाचे असते.कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यात कर्म असावेच लागते.

प्रश्न 20. ‘सगळे मुसळ केरात’ या म्हणीचा अर्थ सांगा ?
1) संपूर्ण काम फसणे
2) सगळ्यांनाच फायदा होणे
3) अकांड तांडव करणे
4) नशीब पालटणे
उत्तर : 1) संपूर्ण काम फसणे
स्पष्टीकरण : सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ होतो केलेले सर्व काम व्यर्थ जाणे.

प्रश्न 21. ‘देशोधडीला लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
1) फिरायला जाणे
2) अधोगती होणे
3) मरण पावणे
4) शरण येणे
उत्तर : 2) अधोगती होणे
स्पष्टीकरण : यशोधडीला लागणे म्हणजे अधोगती होणे.
बोल लावणे – दोष देणे
राम म्हणणे – मरण पावणे
मात्रा चालणे – योग्य परिणाम होणे

प्रश्न 22. ‘मी तेव्हा खेळत असेन’. या वाक्यातील काळ ओळखा.
1) रिती भविष्यकाळ
2) साधा भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) अपूर्ण भविष्यकाळ
उत्तर : 4) अपूर्ण भविष्यकाळ
स्पष्टीकरण : भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दर्शविण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरतात.

प्रश्न 23. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई-कॉमर्स तर संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे काय ?
1) E- mail
2) E- post
3) E- Banking
4) E- Writing
उत्तर : 1) E- mail
स्पष्टीकरण : संगणकीय पत्रव्यवहार म्हणजे ई-मेल होय.

प्रश्न 24. अरेरे! खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरेरे! या शब्दाची जात ओळखा.
1) क्रिया विशेषण अव्यय
2) शब्दयोगी अव्यय
3) केवलप्रयोगी अव्यय
4) यापैकी कोणतेही नाही
उत्तर : 3) केवलप्रयोगी अव्यय
स्पष्टीकरण : आपल्या मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.
केवलप्रयोगी अव्यय भावनाप्रधान असतात. केवलप्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार पडतात.

प्रश्न 25. ‘विद्वान’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते ?
1) विद्रूप
2) विद्वत्ता
3) विदुषी
4) विद्या
उत्तर : 3) विदुषी
स्पष्टीकरण : विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप विदुषी होय.
उदा. ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती
युवा – युवती
श्रीमान – श्रीमती
राजा – राणी
भगवान- भगवती


 

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price