Maharashtra Police Bharti 2024 Questions 07 | Maharashtra Police Bharti 2023 Question Papers

Maharashtra Police Bharti 2024 Questions 07 | Police Bharti 2023 च्या मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न

Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्‍या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.

Maharashtra Police Bharti 2024 Questions 07
Maharashtra Police Bharti 2024 Questions 07

 

प्रश्न 1. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पाहिला आशियाई देश कोणता आहे ?
1. भारत
2. दक्षिण कोरिया✔️
3. जपान
4. तैवान
स्पष्टीकरण : नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा दक्षिण कोरिया हा पाहिला आशियाई देश आहे.
नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये झाली.
NATO – नॉर्थ अटलांटिक संधी संघटना.
स्थापना – 1949
देश (31) युरोपियन देश -29
2 देश उत्तर अमेरिकेतील
31 वा फिनलंड.

प्रश्न 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणुन ……… यांची नेमणूक झाली ?
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. टी. एन. शेषन
3. सुकुमार सेन ✔️
4. नीला सत्यनारायण
सुकुमार सेन – स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते.
त्यांचा कार्यकाल -21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958
शिक्षण – कलकत्ता प्रेसिडेन्सी विद्यापीठ.
निवडणुक आयोग -25 जानेवारी 1950
आताचे (2023) निवडणूक आयुक्त (25) वे राजीव कुमार हे आहेत.

प्रश्न 3. 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. इचलकरंजी
2. सांगली
3. सातारा
4. कोल्हापूर ✔️
स्पष्टीकरण : 2022 मध्ये 28 वी महानगरपालिका म्हणुन इचलकरंजी ला घोषित केले व 29 वी महानगरपालिका- जालना होय.
इचलकरंजी हि महानगरपालिका कोल्हापूर जिल्हात आहे.
इचलकरंजी नगरपालिका होती तिचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले.
इचलकरंजी वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ( महाराष्ट्राचे मँचेस्टर)

प्रश्न 4. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून ……….. आकारला जातो.
1. IGST
2. CGST✔️
3. SGST
4. UTGST
स्पष्टीकरण : अत्यावश्यक वस्तूवर केंद्र सरकार CGST हा कर आकारते.
CGST -goods service tax लागू -1 एप्रिल 2017
GST चे प्रकार पुढीप्रमाणे
IGST – इंटिग्रेटेड वस्तू व सेवा कर
CGST- केंद्र वस्तू व सेवा कर
SGST – राज्य वस्तू व सेवा कर
UTGST – केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर
एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो.

प्रश्न 5. शेतकऱ्यांनी ……….. जिल्हात साराबंदीची चळवळ सुरु केली होती ?
1. गोरखपूर
2. खेडा ✔️
3. सोलापूर
4. अमरावती
स्पष्टीकरण : गुजरात मधील खेडा जिल्हात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पीकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता.
गांधीजीनी शेतकऱ्यांना शेतसारा न देण्याचा सल्ला दिला.
तेव्हा 1918 मध्ये शेतकऱ्यांनी खेडा जिल्हात साराबंदीची चळवळ सुरु केली.
गांधीजींचे बाकी असहकार सत्याग्रह
चंपारण्य सत्याग्रह (1917)
अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (1918)

प्रश्न 6. महाबळेश्वर जवळील भिलार हे ……… गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
1. पुस्तकांचे ✔️
2. वनस्पतीचे
3. आंब्याचे
4. किल्ल्याचे
स्पष्टीकरण : महाबळेश्वर मधील भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव ‘ म्हणुन प्रसिद्ध आहे.
या गावात जवळजवळ प्रत्येक घरात ग्रंथालय तयार करून ठेवले आहे.
ही संकल्पना इंग्लंडमधील वेल्श काउंटीच्या आत असलेल्या ‘ हे ऑन वे’ शहरापासुन प्रेरित आहे.

Telegram

प्रश्न 7. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
1.क्षणिक
2. पूर्वी
3. नंतर
4. पर्याय दोन व तीन दोन्ही ✔️
स्पष्टीकरण : हल्लीचे विरुद्धार्थी शब्द
पूर्वी
नंतर हे आहेत.

प्रश्न 8. वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो ?
1. फ्रान्स नौदल ✔️
2. अमेरिकन नौदल
3. श्रीलंकन नौदल
4. बांगलादेशी नौदल
स्पष्टीकरण : वरुणा हा भारत व फ्रान्स या देशादरम्यानचा नौदल सराव आहे.
हा सराव द्विवार्षिक आहे.
2001 साली प्रथम हा सराव आयोजित केला.
दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाचा अविभाज्य भाग आहे.
दोन्ही देशांची विमाने, जहाजे ,पाणबुड्या, सागरी गस्त घालणारी विमाने, लढाई हेलिकॉप्टर, सहभागी होतात.
इतर नौदल सराव-
Jimex – भारत- जपान
Salvex – भारत- अमेरिका.

प्रश्न 9. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला ?
1. कोलकाता
2. नवी दिल्ली✔️
3. मुंबई
4. तेलंगाना
स्पष्टीकरण : विरासत साडी महोत्सव- नवी दिल्ली, 3 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 दरम्यान हॅन्डलूम हाट, जनपथ, नवी दिल्ली पार पडला.
हा साडी महोत्सव वस्त्राउद्योग मंत्रालयाने आयोजित केला होता.

प्रश्न 10. महाराष्ट्र सरकारने…… हा दिवस आजी- आजोबा दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरवले आहे ?
1. 10 जून
2. 10 जुलै
3. 10 सप्टेंबर ✔️
4. 10 ऑक्टोबर
स्पष्टीकरण : 10 सप्टेंबर 2023 रोजी आजी आजोबा दिवस साजरा करण्याचे आदेश शासनाने जारी केले.
या दिवशी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर व शाळा स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करावा असे नमूद केले आहे.

प्रश्न 11. कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून चॅटजीपीटी हा रोबो ( यंत्रमानव)……… या अमेरिकेन कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला.
1. ओपनएआय✔️
2. ओपनपीएआय
3. ओपनफोरयू
4. ओपनक्यूआर
स्पष्टीकरण : ओपन ए आय (open AI) या अमेरिकन कंपनीने chat gpt (chat generative pre- trained transformer)
30 नोव्हेंबर 2022 ला बाजारात आणला.
हे एक भाषा मॉडेल आधारित चॅटबॉट आहे. वापरकर्त्यांना इच्छित लांबी, स्वरूप, शैली पातळीवर, संभाषण, सुधारण्यात आणि चालवण्यास सक्षम करते.

प्रश्न 12. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार…….. येथे आहे.
1. नवी दिल्ली ✔️
2. कोलकत्ता
3. मुंबई
4. चेन्नई
स्पष्टीकरण : भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तऐवज जतन करून ठेवन्याचे ठिकाण होय.
प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते.

प्रश्न 13. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा -फारकत होणे.
1. वेगळे होणे ✔️
2. सामावून घेणे
3. हाकलून देणे
4. बहिष्कृत करणे
स्पष्टीकरण : वेगळे होणे -फारकत घेणे
सामावून घेणे -समावेश करणे
हाकलून देणे -काढून देणे
बहिष्कृत करणे- कायमचे बेदखल करणे

प्रश्न 14. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थेमध्ये महिलांसाठी …….. जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत ?
1. 25%
2. 30%
3. 40%
4. 50%✔️
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आंध्रप्रदेश,बिहार, छत्तीसगड ,झारखंड, केरळ, महाराष्ट्र ,ओरिसा ,राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यात महिलांसाठी सदस्य आणि सरपंचामध्ये 50 टक्के आरक्षणासाठी कायदेशीर तरतूद केली आहे.

प्रश्न 15. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे ?
1. महिला शेतकरी सन्मान वर्ष
2. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष
3. मत्स्यपालन वर्ष
4. भरडधान्य वर्ष✔️
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्राद्वारे 2023 वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेद्वारे हे वर्ष जाहीर करण्यात आले.
70 देशांनी या गोष्टीला पाठिंबा दिला.
हे वर्ष भरडधान्य वर्ष लागू केल्यामुळे भरडधान्य बाबत जागरूकता व आरोग्याशी संबंधित धोरणे आखताना देशांना मदत होणार आहे.

प्रश्न 16. 1 जानेवारी 2023 रोजी ………या देशाने युरो हे चलन स्वीकारले.
1. इराण
2. इराक
3. युक्रेन
4. क्रोएशिया✔️
स्पष्टीकरण : एक जानेवारी 2023 रोजी क्रोएशियाने युरो हे चलन स्वीकारले.
युरोझोन मध्ये सामील होणारा क्रोएशिया 27 वा देश आहे.
युरो चलन एक जानेवारी 1999 पासून लागू.

प्रश्न 17. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे ?
1. श्रीनिवास खळे
2. शाहिर साबळे
3. राजा बडे✔️
4. अमर साबळे
स्पष्टीकरण : जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिले आहे.
हे गीत संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केले आहे.
या गीताचे गायक शाहीर साबळे आहेत.
19 फेब्रुवारी 2023 पासून या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला गेला आहे.
स्वतःचे राज्य गीत असणारे महाराष्ट्रा 12 वे राज्य आहे.

प्रश्न 18. खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?
1. मध्य रेल्वे ✔️
2. दक्षिण मध्य रेल्वे
3. उत्तर रेल्वे
4. दक्षिण किनारी रेल्वे
स्पष्टीकरण : मध्य रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गावर 3825 किलोमीटर 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य केले आहे.
मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन इलेक्ट्रिकफाइड सेक्शन म्हणजेच सोलापूर विभागातील ऑर्सारोड -लातूर रोडचे विद्युतीकरण शेवटी पूर्ण केले.
मध्य रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गावर पूर्णपणे विद्युतीकरण केल्याने दरवर्षी 5.204 लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात मदत झाली आहे.

प्रश्न 19. 2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
1. मुंबई
2. बेंगळुरू
3. दिसपुर
4. जयपूर✔️
स्पष्टीकरण : 2023 ची जागतिक सुरक्षा परिषद जयपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
भारताचे रेल्वे संरक्षण दल व UIC यांच्यात भागीदारीमध्ये ही परिषद आयोजित ब्रीद वाक्य ‘रेल्वे संरक्षण नीती: प्रतिसाद व भविष्य वेध’.
2023 सालची ही परिषद 18 वी होती.
2022 सालची 17 वी परिषद वॉर्सा पोलंड येथे आयोजित केली होती.

Telegram

प्रश्न 20. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?
1. रशिया ✔️
2. मेक्सिको
3. चिली
4. पेरू
स्पष्टीकरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण रशिया येथे करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली सांगली येथे झाला आहे.
अण्णाभाऊ साठे हे समाजसेवक, कवी व लेखक होते.
दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.
फकीरा 1959 राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार.
माझा रशियाचा प्रवास हे प्रवासवर्णन त्यांनी लिहिले.
वैजयंता कादंबरी 1961
वारणेचा वाघ कादंबरी 1970
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पोवाडे .

प्रश्न 21. 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले ?
1. निखत झरीन
2. साक्षी मलिक
3. अचिंता शेऊली
4. मीराबाई चानु ✔️
स्पष्टीकरण : 2022 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत साईखोम मीराबाई चानुने देशासाठी पहिले सुवर्णपदक मिळवले.
अचंता शरत कमलने राष्ट्रकुल खेळात 4पदके (३ सुवर्णपदक व 1 रोप्य) पदक मिळवली.
राष्ट्रकुल स्थापना 28 एप्रिल 1949
देश -54
राष्ट्रकुल स्पर्धा भारतात 2010 साली आयोजित करण्यात आल्या होत्या.

प्रश्न 22. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली ?
1. जलक्रांती
2. हरितक्रांती✔️
3. औद्योगिक क्रांती
4. धवलक्रांती
स्पष्टीकरण : शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती झाली.
भारतात 1966 साली एम. एस .स्वामीनाथन व नॉर्मल बोरलॉग यांच्या प्रेरणेतून मेक्सिको मधून गहूच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यात केली गेली.
अधिक उत्पादन देणारे बियाणे व जलसिंचनाच्या वाढत्या वापराद्वारे भारतातील अन्नधान्य उत्पादन वाढले.
महाराष्ट्रातील हरितक्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली.

प्रश्न 23. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवले आहे ?
1. प्रल्हाद गजेंद्र गडकर
2. शरद बोबडे
3. यशवंत चंद्रचुड
4. लीला सेठ ✔️
स्पष्टीकरण : खालील व्यक्ती महाराष्ट्रातील सर न्यायाधीश झाले.
प्रल्हाद गजेंद्र गडकर
यशवंत चंद्रचूड
शरद बोबडे
सरन्यायाधीश-भारताचे पहिले सरन्यायाधीश एच. जे कानिया, सध्या 2023 मध्ये भारताचे सरन्यायाधीश धनंजय (चंद्रचूड 50 वे )आहेत.

प्रश्न 24. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही ?
1. रोजगाराचा अधिकार
2. माहितीचा अधिकार✔️
3. बालकांचे अधिकार
4. समान कामासाठी समान वेतन
स्पष्टीकरण : माहितीचा अधिकार याचा समावेश मानवी हक्कांमध्ये समाविष्ट होत नाही.
काम करण्याचा हक्क, मुलांचे हक्क आणि समान कामासाठी समान वेतन याचा समावेश 21 व्या शतकातील मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात करण्यात आला आहे.

प्रश्न 25. भारताने 1983 साली कोणाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती ?
1. सुनील गावस्कर
2. कपिल देव ✔️
3. सय्यद किरमाणी
4. संदीप पाटील
स्पष्टीकरण : भारताने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
1983 च्या विश्वचषकचा सामना भारत व वेस्टइंडीज या देशादरम्यान झाला होता.
1983 अंतिम सामना भारताने 43 धावांनी वेस्टइंडीज ला पराभूत केले होते.
1983 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा -डेव्हिड गॉव्हर ( इंग्लंड) ३८४.
सर्वात जास्त बळी- रॉजर बिनी (भारत )18


 

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price