Maharashtra Police Bharti 2024 Questions 12 | Police Bharti 2023 च्या मीरा भाईंदर पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता ?
1. गिरीदुर्ग
2. भुईकोट
3. डोंगरी किल्ला
4. द्वीपदुर्ग
उत्तर : 2. भुईकोट
स्पष्टीकरण : वसईचा किल्ला – भुईकोट प्रकार
मुरुड जंजिरा – जलदुर्ग
राजगड, रायगड, पुरंदर ,तोरणा -डोंगरी किल्ले.
प्रश्न 2. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
1. नरेंद्र मोदी
2. रतन टाटा
3. नितीन गडकरी
4. धर्मेंद्र दास
उत्तर : 1. नरेंद्र मोदी
स्पष्टीकरण : पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदी एप्रिल 2022.
2023 -लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार- आशा भोसले.
प्रश्न 3. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे ?
1. केरळ
2. तामिळनाडू
3. महाराष्ट्र
4. कर्नाटक
उत्तर : 1. केरळ
स्पष्टीकरण : देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य केरळ आहे.
देशातील पहिले पेपरलेस न्यायालय – केरळ.
प्रश्न 4. …………… बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले.
1. युनायटेड बँक
2. इंपीरियल बँक
3. रॉयल बँक
4. युनियन बँक
उत्तर : 2. इंपीरियल बँक
स्पष्टीकरण : 1 जुलै 1995 इंपीरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले.
2 जून 1956 स्टेट बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण.
मुख्यालय- मुंबई
रिझर्व बँकेच्या स्थापनेपूर्वी इंपीरियल बँक ही भारताची मध्यवर्ती बँक होती.
प्रश्न 5. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या ?
1. राजस्थान
2. बिहार
3. उत्तर प्रदेश
4. पश्चिम बंगाल
उत्तर : 3. उत्तर प्रदेश
स्पष्टीकरण : भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या.
प्रश्न 6. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?
1. अमेरिका
2. रशिया
3. जर्मनी
4. चीन
उत्तर : 3. जर्मनी
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कायमस्वरूपी सभासद- अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम.
प्रश्न 7. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते ?
1. कलम 423
2. कलम 234
3. कलम 324
4. कलम 342
उत्तर : 3. कलम 324
स्पष्टीकरण : विधानातील कलम 324 -भारतीय निवडणूक आयोग
स्थापना 25 जानेवारी 1950
25 जानेवारी- राष्ट्रीय मतदार दिन.
प्रश्न 8. त्याचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे ………….. यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली.
1. डॉ.स्वामीनाथन
2. डॉ. प्रमोद सेठी
3. डॉ मोहन राय
4. डॉ.राजेंद्र सिंह
उत्तर : 4. डॉ.राजेंद्र सिंह
स्पष्टीकरण : भारताचे जलपुरुष -राजेंद्र सिंह -राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली.
डॉ. एम.एस. स्वामीनाथन भारताच्या हरितक्रांतीचे जनक.
प्रश्न 9. भारतीय व्यापारी स्पर्धेत …………… यांच्यात तीन युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात.
1. इंग्रज- फ्रेंच
2. इंग्रज -पोर्तुगीज
3. फ्रेंच- डच
4. फ्रेंच -पोर्तुगीज
उत्तर : 1. इंग्रज- फ्रेंच
स्पष्टीकरण : इंग्रज -फ्रेंच यांच्यात तीन युद्ध झाली त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात.
पहिले कर्नाटक युद्ध -1746 ते 1748
दुसरे कर्नाटक युद्ध -1748 ते 1754
तिसरे कर्नाटक युद्ध- 1760
प्रश्न 10. 1802 मध्ये ………….. पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
1. थोरले बाजीराव
2. सवाई माधवराव
3. पेशवे नानासाहेब
4. दुसरा बाजीराव
उत्तर : 4. दुसरा बाजीराव
स्पष्टीकरण : 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला.
वेलस्लीने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर’ तैनाती फौजेचा ‘अवलंब केला.
प्रश्न 12. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
1. डॉ. बी .आर. आंबेडकर
2. विठ्ठल रामजी शिंदे
3. नारायण मोघाजी लोखंडे
4. महात्मा फुले
उत्तर : 2. विठ्ठल रामजी शिंदे
स्पष्टीकरण : डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.
स्थापना: 18 ऑक्टोबर 1906 मुंबई येथे.
प्रश्न 13. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे ………….. कामकाज पाहते.
1. नगरपरिषद
2. महानगरपालिका
3. नगरपंचायत
4. जिल्हापरिषद
उत्तर : 3. नगरपंचायत
स्पष्टीकरण : शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज नगरपंचायत पाहते.
भारतीय राज्यघटनेतील 74 व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद.
प्रश्न 14. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात ?
1. अपूर्णविराम
2. लोपचिन्ह
3. संयोग चिन्ह
4. अपसरण चिन्ह
उत्तर : 1. अपूर्णविराम
स्पष्टीकरण : वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम हे विरामचिन्ह वापरतात.
अपूर्णविराम म्हणजे उप पूर्णविराम. पुढील चिन्हाने दाखवतात: उदा. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले: 1,8,14,24,40
प्रश्न 15. ‘इंद्र’ या शब्दाचा समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.
1. श्रीपती
2. नागेश
3. शुक्र
4. अमरेंद्र
उत्तर : 1. श्रीपती
स्पष्टीकरण : समानार्थी शब्द इंद्र- नागेश, शुक्र ,अमरेंद्र ,वज्रपाणी, पुरंदर, वासव, देवेंद्र, अमराधिपती.
श्रीपती- विष्णू, रमापती ,रमेश, चक्रपाणी, त्रिविक्रम.
प्रश्न 16. ‘अकरावा गुरु होणे ‘या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून निवडा.
1. कामात विघ्न येणे
2. कामात यश येणे
3. बुद्धी न वापरणे
4. भाग्य उजळणे
उत्तर : 4. भाग्य उजळणे
स्पष्टीकरण : अकरावा गुरु होणे- भाग्य उजळणे.
बुद्धी न वापरणे – अकलेचा कांदा असणे.
प्रश्न 17. शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः …………… शक्ती मानल्या जातात.
1. दोन
2. तीन
3. चार
4. निश्चित नाही
उत्तर : 2. तीन
स्पष्टीकरण : शब्दांच्या मुख्यतः तीन शक्ती मानल्या जातात
अभिधा, व्यंजना, लक्षणा .
🟢पोलीस भरती सराव प्रश्नसंच🟢
Police Bharti 2024 Question Set 01
Police Bharti 2024 Question Set 02
प्रश्न 18. G-20 बैठकीचे यावर्षीचे (2023) घोषवाक्य काय आहे ?
1. मातृ देवो भव
2. सत्यमेव जयते
3. वसुधैव कुटुंबकम
4. यापैकी नाही
उत्तर : 3. वसुधैव कुटुंबकम
स्पष्टीकरण : भारतात ही 18 वी G-20 शिखर परिषद आहे.
वसुधैव कुटुम्बकम हे G-20 चे घोषवाक्य आहे.
G-20 स्थापना 1999 ला झाली.
प्रश्न 19. LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
1. सिद्धार्थ मोहंती
2. एम.आर .कुमार
3. माधव कौशिक
4. यापैकी नाही
उत्तर : 1. सिद्धार्थ मोहंती
स्पष्टीकरण : एलआयसी चे सध्याचे अध्यक्ष सिद्धांत मोहंती आहेत. स्थापना:16 सप्टेंबर 1956
मुख्यालय : मुंबई
प्रश्न 20. ‘कोसला’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
1. नामदेव ढसाळ
2. भालचंद्र नेमाडे
3. बाबुराव बागुल
4. नरहर कुरुंदकर
उत्तर : 2. भालचंद्र नेमाडे
स्पष्टीकरण : भालचंद्र नेमाडे यांनी कोसला कादंबरी लिहिली.
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
‘हिंदू’ एक समृद्ध अडगळ- 2015.
प्रश्न 21. भारतीय संसदेने …………साली हिंदू विवाह कायदा संमत केला ?
1. 1953 साली
2. 1954 साली
3. 1955 साली
4. 1956 साली
उत्तर : 3. 1955 साली
स्पष्टीकरण : भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये स्थापन केला.
हिंदू वारसा हक्क कायदा- 1956
हिंदू दत्तकविधान व निर्वाह कायदा- 1956
प्रश्न 22. जून 1757 ……………च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला ?
1. प्लासी
2. बक्सार
3. पानिपत
4. कालिकत
उत्तर : 1. प्लासी
स्पष्टीकरण : 23 जून 1757 प्लासीची लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला.
सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात लढाई.
सिराज उद्दौला चा पराभव.
प्रश्न 23. ‘ग्रामगीता’ कोणी लिहिला आहे ?
1. संत गाडगेबाबा
2. संत तुकडोजी महाराज
3. विनोबा भावे
4. लोकमान्य टिळक
उत्तर : 2. संत तुकडोजी महाराज
स्पष्टीकरण : ग्रामगीता हे महाकाव्य संत तुकडोजी महाराज यांनी लिहिले .
संत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी, अमरावती येथे आहे.
प्रश्न 24. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ?
1. सरोजनी नायडू
2. ऐनी बेझंट
3. पंडिता रमाबाई
4. सरस्वतीबाई जोशी
उत्तर : 2. ऐनी बेझंट
स्पष्टीकरण : एनी बेझंट राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष.
राष्ट्रीय काँग्रेसचे तेहतीसावे अधिवेशन कलकत्ता येथे झाले 28 ते 29 डिसेंबर 1917 दरम्यान याच्या अध्यक्षा ऐनी बेझंट होत्या.
प्रश्न 25. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?
1. आगाखान
2. खान अब्दुल गफार खान
3. महात्मा गांधी
4. मोहम्मद अली जिना
उत्तर : 2. खान अब्दुल गफार खान
स्पष्टीकरण : सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना या नावाने ओळखले जाते.
खान अब्दुल गफार खान यांनी खुदा- ए -खिदमतगार नावाची संघटना 1930 ला स्थापन केली.