Maharashtra Police Bharti 2024 Questions 08 | Police Bharti 2023 च्या मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1. माथेरान- थंड हवेचे ठिकाण
2. ताडोबा- लेणी✔️
3. कोल्हापूर -देवस्थान
4. अजिंठा -जागतिक वारसा स्थळ
स्पष्टीकरण : ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून विधान 2 चुकीचे आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प -ताडोबा -अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळखला जातो .कारण यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे.
ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून त्याचे क्षेत्र ६२३ चौ. किमी .आहे.
माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे .येथील टॉय ट्रेन प्रसिद्ध आहे.
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे.
अजिंठा वेरूळ १९८३ साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.
प्रश्न 2. ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद …………… यांनी केला ?
1. जेम्स मिल
2. फ्रेडरिक मॅक्समुलर✔️
3. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
4. जॉन मार्शल
स्पष्टीकरण : हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा अनुवाद फ्रेडरिक मॅक्समुल्लर यांनी केला.
हितोपदेश या संस्कृत भाषेतील ग्रंथात प्राणी आणि मानवी पात्रे असलेल्या दंतकथा आहेत.
हितोपदेशातील मजकुर कोणी लिहिला हा संभ्रम आहे पण भारतीय शास्त्रज्ञांनी त्याचे श्रेय विष्णू वर्मा यांना दिले.
प्रश्न 3. इ. स. 1974 साली भारताने या ठिकाणी …………. अणुचाचणी केली.
1. श्रीहरीकोटा
2. तुंबा
3. पोखरण ✔️
4. जैतापूर
स्पष्टीकरण : भारताने 18 मे 1974 ला पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान या ठिकाणी घेतली.
या पहिल्या चाचणीचे सांकेतिक नाव ‘आणि बुद्ध हसला ‘असे होते.
या चाचणीवेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या.
भारताने या चाचणीनंतर 11 मे 1998रोजी तीन अणुचाचण्या व 13 मे 1998 रोजी 2 अणुचाचण्या घेतल्या .या चाचणीची सांकेतिक नाव ‘ऑपरेशन शक्ती’ होते.
प्रश्न 4. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ………….. म्हणतात.
1. ठकी ✔️
2. कालीचंडिका
3. गंगावती
4. चंपावती
स्पष्टीकरण : महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बाहुलीला ठकी असे म्हणतात . ठकी हे लहान मुलींचे खेळणे आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवतात.
प्रश्न 5. ‘कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
1. राजीव
2. सरोज
3. अंबुज
4. वायस ✔️
स्पष्टीकरण : कमळाचे समानार्थी शब्द राजीव, सरोज, अंबुज.
वायस हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे.
प्रश्न 6. भारतातील पहिला वेस्ट- टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे ?
1. अहमदाबाद
2. मुंबई
3. दिल्ली
4. पुणे✔️
स्पष्टीकरण : भारतातील पहिला वेस्ट -टू हायड्रोजन प्रकल्प पुणे येथे स्थापित केला गेला आहे.
पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
महापालिकेने ‘द ग्रीन बिलियंस लिमिटेड’ या कंपनीशी ३० वर्षासाठी करार केला आहे.
यात 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे.
प्रश्न 7. डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात या …………. शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
1. चेन्नई
2. वेल्लोर✔️
3. हैदराबाद
4. मुंबई
स्पष्टीकरण : भारतात वेल्लोर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया डॉ. एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
प्रश्न 8. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
1. कुतुबमिनार- मेहरोली
2. गोलघुमट -विजापूर
3. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस -दिल्ली✔️
4. ताजमहल – आग्रा
स्पष्टीकरण : छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई येथे आहे. हे जागतिक वारसा स्थान आहे व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. 1887 मध्ये विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आले.
प्रश्न 9. इ. स.1992 मध्ये ………. या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
1. महाराष्ट्र
2. गुजरात
3. आंध्रप्रदेश ✔️
4. उत्तराखंड
स्पष्टीकरण : 1992 मध्ये आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात मध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली.
जिल्ह्यातील गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढा म्हणून चळवळ सुरू केली व लवकरच ती पूर्ण महिला चळवळीत बदलली.
प्रश्न 10. भारत सेवक समाजाची स्थापना ……… यांनी केली.
1. गणेश वासुदेव जोशी
2. भाऊ दाजी लाड
3. म .गो.रानडे
4. गोपाळ कृष्ण गोखले✔️
भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली . पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचे उद्दिष्ट- भारतातील नागरिकांसाठी स्वयंसेवी सेवेचे मार्ग शोधणे व विकसित करणे.
राष्ट्रीय पर्याप्तेला चालना देण्यासाठी आणि देशाची आर्थिक ताकद निर्माण करणे.
प्रश्न 11. संसदीय शासनपद्धती ……… येथे विकसित झाली.
1. इंग्लंड✔️
2. अमेरिका
3. फ्रान्स
4. नेपाळ
संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार पारंपारिक किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेतांच्या आधारे चालतो. संविधान म्हणजे ग्रंथरूपात न लिहिलेले संविधान. पार्लमेंट ही संस्था ही तिथे हळूहळू विकसित होत गेलेली आहे.
प्रश्न 12. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख ……….. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
1. 12
2. 14 ✔️
3. 16
4. 18
स्पष्टीकरण : 19 जुलै 1969 रोजी देशातील 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
हा निर्णय इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात घेण्यात आला.
त्या काळात भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँकापेक्षा खाजगी बँकाचा अर्थव्यवस्थेवर दबदबा होता.
तसेच 1980 साली ही सहा अनुसूचित बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.
प्रश्न 13. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले ?
1. लिबिया
2. रशिया✔️
3. युक्रेन
4. इराण
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवी हक्क संघटनेतून निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
अमेरिकेने सुरू केलेल्या ठरावाच्या बाजूने 93 मते मिळाली, तर 24 देशांनी नाकारला आणि भारतासह 58 देश गैरहजर राहिले.
प्रश्न 14. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2. डॉ. राजेंद्र प्रसाद ✔️
3. दुर्गाबाई देशमुख
4. बी .एन .राव
स्पष्टीकरण : 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले.
त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरता काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली.
13 डिसेंबर 1946 ला’ उद्दिष्टाचा ठराव’ स्वीकारला गेला.
प्रश्न 15. परम- 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत ?
1. डॉ.विजय भटकर ✔️
2. डॉ. आर. एच. दवे
3. पी. पार्थसारथी
4. यापैकी कोणीही नाही
स्पष्टीकरण : परम 800 हा संगणक डॉ.विजय भटकर यांनी तयार केला.
हा संगणक CADC या संस्थेने पुणे येथे तयार केला.
सध्या ऐरावत हा भारताचा महासंगणक सर्वाधिक वेगवान आहे.
अंतर प्रत्युष व मिहिर हे महासंगणक आहेत.
प्रश्न 16. 2022 सालच्या WHO च्या अमृतमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती ?
1. आरोग्यम धनसंपदा
2. आरोग्य हेच जीवन
3. शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता✔️
4. पौष्टिकमय खाणे -आरोग्यमय
स्पष्टीकरण : शांततेसाठी आरोग्य आरोग्यासाठी शांतता.
डब्ल्यू एच ओ च्या अमृत महोत्सवी २२ – २८ मे २०२२ रोजी जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आयोजित केला .या वर्षाची थीम शांततेसाठी आरोग्य आरोग्यासाठी शांतता.
भारताचे आरोग्य सचिव, राजेश भूषण यांची 75 व्या जागतिक आरोग्य सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न 17. भारताचे ……… हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
1. राष्ट्रपती
2. उपराष्ट्रपती✔️
3. प्रधानमंत्री
4. सरन्यायाधीश
स्पष्टीकरण : भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
उपराष्ट्रपती पद हे अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारित .
कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते.
सध्या जगदीश धनगड चौदावे उपराष्ट्रपती आहेत.
कलम 66- उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
कलम 69 उपराष्ट्रपती पदाची शपथ राष्ट्रपतीद्वारे.
घटनेत उपराष्ट्रपती म्हणून पगार नसतो तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पगार मिळतो.
प्रश्न 18. 1 मे 1960 रोजी ………. राज्याची निर्मिती झाली.
1. गोवा
2. आंध्रप्रदेश
3. कर्नाटक
4. महाराष्ट्र✔️
स्पष्टीकरण : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याची निर्मिती झाली.
1956 -1960 द्विभाषिक राज्याचा प्रयोग.
एप्रिल 1960 संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला.
4 प्रशासकीय भाग व 26 जिल्हे महाराष्ट्रात होते.
महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला.
प्रश्न 19. भारतातील ………. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
1. ताग
2. खादी व ग्रामोद्योग
3. सिमेंट
4. वाहन✔️
स्पष्टीकरण : उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते.
भारतात वाहन उद्योग क्षेत्राची भरभराट झाली आहे.
प्रश्न 20. पुण्यातील ……….. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
1. आगाखान पॅलेस ✔️
2. साबरमती आश्रम
3. सेल्युलर जेल
4. लक्ष्मी विलास पॅलेस
स्पष्टीकरण : पुण्यातील आगाखान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
आगाखान पॅलेस प्रसिद्ध वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शहा यांनी केली.
महात्मा गांधी 1942 ते 1944 या काळात या वास्तूत राहिले.
प्रश्न 21. भारतीय हरितक्रांतीचे जनक ………….. होते.
1. डॉ. वर्गीस कुरियन
2. डॉ.होमी भाभा
3. डॉ.एम एस स्वामीनाथन ✔️
4. डॉ.नॉर्मन बोरलॉग
स्पष्टीकरण : भारतातील हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन हे आहेत.
स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे भारत गहू व तांदूळ उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ शकला.
आम्ही नातं यांनी नॉर्मल बोरलॉग यांच्या साह्याने 1960 च्या दशकात उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणाच्या लागवडीचा प्रयोग राबवला.
जगातील हरित क्रांतीचे जनक – नॉर्मन बोरलॉग
भारतातील हरितक्रांती चे
जनक-एम .एस.स्वामीनाथन
महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक- वसंतराव नाईक.
प्रश्न 22. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ?
1. प्रधानमंत्री
2. सरन्यायाधीश
3. गृहमंत्री
4. राष्ट्रपती✔️
स्पष्टीकरण : भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते.
या न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या शिफारस केलेल्या व्यक्तीची नियुक्ती करत असते याला कॉलेजियम पद्धत म्हणतात.
प्रश्न 23. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती ?
1. युनिसेफ
2. युनेस्को
3. विश्वस्त मंडळ
4. रेड क्रॉस
भारतातील बाल -कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ कार्यशाळा आयोजित करते.
युनिसेफ – युनाइटेड नेशन चिल्ड्रन फंड
स्थापना : 11 डिसेंबर 1946
अध्यक्ष : कॅथरीन रसेल
प्रश्न 24. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ………. ची स्थापना करण्यात आली.
1. बी.एस.एफ.
2. सी.आर. पी. एफ.
3. एन. सी. सी.✔️
4. आर. ए. एफ.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन.सी.सी .ची स्थापना करण्यात आली.
एन.सी.सी.( राष्ट्रीय छात्र सेना)
स्थापना -26 नोव्हेंबर 1948
एन.सी.सी .ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरि सेवेसाठी मुलांचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे.
देशातील बहुतेक सर्व शाखा व महाविद्यालयांमध्ये ही योजना राबविली जाते.
प्रश्न 25. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ………….. यांना मानतात.
1. संत ज्ञानेश्वर
2. संत तुकाराम
3. संत नामदेव✔️
4. संत एकनाथ
स्पष्टीकरण : महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव हे आहेत.
संत नामदेव जन्म : नरसी ( हिंगोली) 1270 मृत्यू: पंढरपूर (सोलापूर )१३५०
संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते.
संत नामदेवांचा जन्म शिंपी कुटुंबातील होता.
संत नामदेव भगवंताच्या प्रचारासाठी पंजाब मध्ये गेले.
त्यांच्या अभंगाचे काही श्लोक ‘मुखबाणी ‘च्या शिखांच्या ग्रंथात आढळतात.
नामदेवांच्या नावावर 2500 अभंग आहेत.
संत नामदेवांच्या समकालीन संत एकनाथ होते.