Maharashtra Police Bharti 2024 Questions 09 | Maharashtra Police Bharti 2023 Question Papers

Maharashtra Police Bharti 2024 Questions 09 | Police Bharti 2023 च्या नवी मुंबई पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न

Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्‍या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.

Maharashtra Police Bharti 2024 Questions 09
Maharashtra Police Bharti 2024 Questions 09

 

प्रश्न 1. ‘किरकोळ’शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
1. रोख
2. उधार
3 घाऊक✔️
4. कृश
स्पष्टीकरण : किरकोळ x घाऊक
रोख x उधार

प्रश्न 2. ‘मारुतीचे शेपूट’या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?
1. लंकेच्या दहनासाठी असलेले शेपूट
2. चर्चेला ऊत येणे
3. लांबत जाणारे काम ✔️
4. पटकन संपणारी गोष्ट
स्पष्टीकरण : मारुतीचे शेपूट म्हणजे न संपणारे लांबत जाणारे काम होय.

प्रश्न 3. कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द लिहा.
1. गाजर पारखी✔️
2. घाण्याचा बैल
3. अंगठा छाप
4. चर्पट पंजरी
स्पष्टीकरण : गाजर पारखी -कसलीही पारख नसलेला
घाण्याचा बैल- सतत कामात जुंपलेला माणूस.
अंगठा छाप- निरक्षर मनुष्य.
चर्पटपंजरी-निरर्थक व लांबलचक भाषण.

प्रश्न 4. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ?
1. आकाश ठेंगणे होणे
2. उखळ पांढरे होणे ✔️
3. मोक्ष मिळणे
4. परिधान करणे
स्पष्टीकरण : उखळ पांढरे होणे- पुष्कळ द्रव्य मिळणे ,वैभव प्राप्त होणे.
आकाश ठेंगणे होणे -गर्वाने फुगून जाणे.

प्रश्न 5. ‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
1. नशीब फिरणे
2. वाईट दिवस येणे
3. दैव प्रतिकूल होणे
4. दैव अनुकूल होणे ✔️
स्पष्टीकरण : दैवाने हात देणे- दैव अनुकूल होणे
दुर्दशा होणे- वाईट दिवस येणे,
दैना उडणे- वाईट अवस्था होणे.

प्रश्न 6. अपूर्ण म्हण पूर्ण करा. ……… वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
1. घंटा
2. गाजराची पुंगी ✔️
3. शिट्टी
4. जादुई बासरी
स्पष्टीकरण : ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली ‘.-एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम ,नाही तर तिचा उपयोग अन्य तऱ्हेने करून घेता येईल.

Telegram

प्रश्न 7.’ काखेत कळसा आणि गावाला वळसा ‘या म्हणीचा अर्थ ओळखा.
1. कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे.
2. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.✔️
3. गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे.
4. गरज एका ठिकाणी असताना दुसरा ठिकाणी पोहोचणे.
स्पष्टीकरण : काखेत कळसा आणि गावाला वळसा ‘या म्हणीचा अर्थ आहे वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.
गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे- आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी.

प्रश्न 8. नीलू नावाचा काळा कुत्रा होता . विशेषण ओळखा
1. नीलू
2. नव
3. काळा ✔️
4. कुत्रा
स्पष्टीकरण : विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द.
नीलू नावाचा काळा कुत्रा होता.
-वरील वाक्यात ‘कुत्रा’ हे नाम आहे. काळा हा शब्द कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करत आहे.

प्रश्न 9. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?
1. वारंवार
2. पटपट
3. खाली ✔️
4. नेहमी
स्पष्टीकरण : स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय हे वाक्यातील क्रिया घडण्याचे ठिकाण दाखवतात.
उदा .खाली, वर, इकडे, आत,सर्वत्र ,तिथे.

प्रश्न 10. ‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
1. पुल्लिंग
2. स्त्रीलिंग
3. नपुसकलिंग ✔️
4. उभयलिंग
सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात.
उदा. देवघर – ते – नपुसकलिंग
भाऊबहीण- ते -स्त्रीलिंगी
भाजीपाला- तो -पुल्लिंगी

प्रश्न 11. तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण ?
1. प्र.के.अत्रे✔️
2. रा.ग.गडकरी
3. पु.ल.देशपांडे
4. वि. वा.शिरवाडकर
स्पष्टीकरण : प्र .के. अत्रे यांची काही प्रसिद्ध नाटके-
तो मी नव्हेच
मोरूची मावशी
लग्नाची बेडी
ब्रह्मचारी
भ्रमाचा भोपळा

प्रश्न 12. ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
1. रेने देकार्त
2. जॉर्ज हेगेल
3. कार्ल मार्क्स✔️
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण : कार्ल मार्क्स जर्मन विचारवंत दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला.
या पुस्तकात मार्क्सने भांडवलदारी उत्पादन पद्धतीमध्ये असलेल्या आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ खालील प्रमाणे आहेत
द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
द बुद्धा अँड हिज धम्मा

प्रश्न 13. गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा.
1. शिलॉंग
2. रायपूर
3. बडोदा ✔️
4. हैदराबाद
स्पष्टीकरण : पर्यायामधील शिलॉंग, रायपूर, हैदराबाद, हे राज्यांच्या राजधानीची शहरी आहेत व बडोदा ही राजधानी नाही.
मेघालय -शिलॉंग
छत्तीसगड- रायपूर
तेलंगणा – हैदराबाद
गुजरात – गांधीनगर

प्रश्न 14. भारताचे उपराष्ट्रपती हे……….. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
1. लोकसभा
2. विधानसभा
3. विधान परिषद
4. राज्यसभा ✔️
स्पष्टीकरण : भारतीय संविधानातील कलम 63 -उपराष्ट्रपती पदासाठी तरतूद.
कलम 64- उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष मात्र राज्यसभेचे सदस्य कधीच नसतात.
उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य भाग घेतात.

प्रश्न 15. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?
1. 11 एप्रिल 1827✔️
2. 17 एप्रिल 1852
3. 11 एप्रिल 1837
4. 22 एप्रिल 1836
स्पष्टीकरण : जन्म- 11 एप्रिल 1827
1848 मध्ये महात्मा फुलेंनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली.
24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

प्रश्न 16. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. आर्थिक धोरण
2. हरितक्रांती
3. धवल क्रांती ✔️
4. शैक्षणिक धोरण
स्पष्टीकरण : वर्गीस कुरियन- धवल क्रांतीचे जनक
श्वेत क्रांती (धवल क्रांती) दूध उत्पादनाशी संबंधित
Operation flood – दूध उत्पादन वाढून दुधाचा महापूर यावा ही संकल्पना.

प्रश्न 17. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
1. श्री.एकनाथ शिंदे
2. श्री.देवेंद्र फडणवीस✔️
3. श्री .सुधीर मुनगुंटीवार
4. श्री. शंभूराजे देसाई
स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री- श्री. देवेंद्र फडवणीस
श्री .एकनाथ शिंदे- माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास, परिवहन ,खनिकर्म इ.
श्री. सुधीर मुनगंटीवार वने ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय

प्रश्न 18. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
1. 7 जून
2. 6 जून
3. 5 जून✔️
4. 8 जून
स्पष्टीकरण : पर्यावरण दिन 5 जून ला साजरा केला जातो.

प्रश्न 19. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
1. श्री.वाय .व्ही. चंद्रचुड
2. श्री. राजेश पाटील
3. श्री. धर्माधिकारी
4. श्री.डी. वाय. चंद्रचूड ✔️
स्पष्टीकरण : सध्याचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री .डी. वाय. चंद्रचूड
श्री .डी .वाय. चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत.
9 नोव्हेंबर 2022 सरन्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केली.

Telegram

प्रश्न 20. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?
1. श्री. अजित डोवाल✔️
2. श्री. अमित शहा
3. कॅप्टन अमरिंदर सिंह
4. के. विजयकुमार
स्पष्टीकरण : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहेत.
भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे ब्रजेश मिश्रा होते.
राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार- दत्ता पडसलगीकर, रजिंदर खन्ना, विक्रम मिस्त्री, पंकज कुमार सिंह.

प्रश्न 21. ………. च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणातात.
1. इथेनॉल
2. कार्बन डाय-ऑक्साइड
3. ऍसिटिक ऍसिड ✔️
4. मिथाईल अल्कोहोल
स्पष्टीकरण : व्हिनेगर – ऍसिटिक ऍसिड चे पाण्यातील द्रावण ऍसिटिक ऍसिडचे विरल द्रावण.
ऍसिटिक ऍसिड- व्हिनेगर मध्ये 10% असते.

प्रश्न 22. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
1. अनाथ आश्रम
2. आर्य समाज
3. रयत शिक्षण संस्था ✔️
4. विवेकानंद शिक्षण संस्था
स्पष्टीकरण : रयत शिक्षण संस्था स्थापना (1919)- कर्मवीर भाऊराव पाटील- कराड जवळील’ काले ‘. गावात
जन्म- 22 सप्टेंबर 1887- कुंभोज (कोल्हापूर)
मुष्टीफंड योजना सुरू केली
दुधगाव विद्यार्थी आश्रम- 1909

प्रश्न 23. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले ?
1. 23 जून 1757✔️
2. 23 जून 1768
3. 23 जून 1758
4. 23 जून 1755
स्पष्टीकरण : 23 जून 1757 प्लासीची लढाई- ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यात झाली.
सिराज उद्दौला चा लढाईत पराभव व मीर जाफर बंगालचा नवाब .

प्रश्न 24. नर्मदा आणि तापी या नद्या………… आहेत.
1. पूर्व वाहिनी
2. पश्चिम वाहिनी ✔️
3. दक्षिण वाहिनी
4. उत्तर वाहिनी
स्पष्टीकरण : नर्मदा आणि तापी पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
नर्मदा उगम -मैकल टेकड्या अमरकंटकर (मध्यप्रदेश)1312 किमी.(भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी) महाराष्ट्रात लांबी -54 किमी.
तापी उगम – मुलताई पर्वत, बैतूल जिल्हा (मध्य प्रदेश )724 किमी.
महाराष्ट्रात लांबी – 208 किमी.

प्रश्न 25. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत ?
1. 17
2. 16
3. 27
4. 20✔️
स्पष्टीकरण : नवी मुंबईमध्ये 20 पोलीस स्टेशन आहेत.
महाराष्ट्रात 12पोलीस आयुक्तालय व 34 पोलीस घटक आहेत.
महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र -8
नवी मुंबई आयुक्तालय स्थापना -1994

 


 

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Leave a Comment

error: Content is protected !!
Chanakya IQ Level Test : 87 में 78 को ढूँढ के दिखाओ, तब ज्ञानी कहलाओगे Unveiling the Gems of the USA: Top Contenders for Prettiest Place Best Places to visit in USA for Couples in May 2024 North India : 10 Must-Visit Destinations of Cultural Splendor and Natural Beauty 10 Best Gaming Phone in India 2024 with Price