Maharashtra Police Bharti 2024 Questions 10 | Police Bharti 2023 च्या ठाणे शहर पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते ?
1. ऍसिटिक ऍसिड
2. सायट्रिक ऍसिड ✔️
3. ऑक्सालिक ऍसिड
4. यापैकी नाही
स्पष्टीकरण : आवळा, लिंबू, संत्री -सायट्रिक ऍसिड
चिंच ,द्राक्ष ,आंबा – टाटारिक ऍसिड
दही – लॅक्टिक ऍसिड
प्रश्न 2. रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वांच्या अभावाने होतो ?
1. जीवनसत्व अ ✔️
2. जीवनसत्व ब
3. जीवनसत्व क
4. जीवनसत्व ई
स्पष्टीकरण : जीवनसत्व अ च्या अभावामुळे रातांधळेपणा होतो.
जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो.
जीवनसत्व ड च्या अभावामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस आणि मोठ्यांमध्ये अस्थीमृदुता होते.
प्रश्न 3. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ?
1. कॉर्डियालॉजिस्ट
2. ऑन्कॉलॉजिस्ट✔️
3. न्यूरोलॉजिस्ट
4. नेफ्रोलॉजिस्ट
स्पष्टीकरण : ऑन्कॉलॉजिस्ट- कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना म्हणतात.
कॉर्डियालॉजिस्ट- हृदयरोगाचे उपचार व निदान करणारे डॉक्टर.
नेफ्रोलॉजिस्ट- किडनीचे आजार उपचार यांचा अभ्यास करणारे डॉक्टर.
प्रश्न 4. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे ?
1. कॅल्शियम कार्बाइड ✔️
2. कॅल्शियम क्लोराइड
3. सोडियम क्लोराईड
4. पोटॅशियम सल्फेट
स्पष्टीकरण : कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड चा वापर होतो.
प्रश्न 5. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो ?
1. चांदी
2. लिथियम ✔️
3. ॲल्युमिनियम
4. कॉपर तांबे
स्पष्टीकरण : लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो .
प्रश्न 6. चॅट जी पी टी हे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे ?
1. चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर✔️
2. चॅट जेनेरीक प्री फिक्स ट्रेनिंग
3. चॅट जनरल प्री डिफाईन टूल्स
4. यापैकी नाही
स्पष्टीकरण : चॅट जी. पी. टी. हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान आहे. त्याचे लघुरूप चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड्स ट्रान्सफॉर्मर आहे.
प्रश्न 7. ………. हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे.
1. निकोटिन ✔️
2. नायट्रोजन
3. क्लोरीन
4. हायड्रोजन
स्पष्टीकरण : निकोटिन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे.
प्रश्न 8. सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे?
1. सल्फ्युरिक ऍसिड
2. हायड्रोक्लोरिक ऍसिड
3. नायट्रिक ऍसिड
4. प्रूसीक ऍसिड ✔️
स्पष्टीकरण : प्रूसीक ऍसिड हे सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव आहे.
रासायनिक सूत्र- CN
प्रश्न 9. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात?
1. पांढऱ्या रक्तपेशी ✔️
2. लाल रक्तपेशी
3. तांबड्या रक्तपेशी
4. यापैकी नाही
स्पष्टीकरण : पांढऱ्या रक्तपेशी- संरक्षक पेशी
पांढऱ्या रक्तपेशी- WBC – white blood cells
तांबड्या पेशीपेक्षा आकाराने मोठ्या, यात केंद्रक असल्याने त्यांचे सूत्री विभाजन होते.
प्रश्न 10. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते?
1. हायड्रोजन
2. नायट्रोजन
3. कार्बन
4. ऑक्सीजन ✔️
स्पष्टीकरण : मानवी शरीरात ऑक्सिजन हे सर्वात जास्त प्रमाणात आढळते.
मानवी शरीरात ऑक्सिजन 65% , कार्बन 18% , हायड्रोजन 0.5% .
प्रश्न 11. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो ?
1. जठर
2. यकृत ✔️
3. आतडे
4. मोठे आतडे
स्पष्टीकरण : कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृतावर होतो.
प्रश्न 12. मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात?
1. 1✔️
2. 2
3. 22
4. 46
स्पष्टीकरण : मानवी गुणसूत्रामधील 1 जोडी लिंग गुणसूत्राची असते.
मानवी शरीरात एकूण 46 गुणसूत्रे असतात. 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात.
प्रश्न 13. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
1. चार्ल्स डार्विन ✔️
2. वॅटसन
3. रॉबर्ट हूक
4. जेम्स वॅट
स्पष्टीकरण : चार्ल्स डार्विन- उत्क्रांतवादाचा सिद्धांत.
रॉबर्ट हूक- पेशींचा शोध.
जेम्स वॅट -वाफेचे इंजन.
वॅटसन व क्रीक -निसर्ग निवडीचा सिद्धांत.
प्रश्न 14. स्पायरोगायरा हे ………….. शैवाल आहे.
1. हरित ✔️
2. मृत
3. शाखायुक्त
4. यापैकी नाही
स्पष्टीकरण : स्पायरोगायरा हि हरित शैवाल आहे.
हरित शेवाळ स्पायरोगायरा, कारा ,युलोथरिक्स, वॉलवॉक्स.
तपकिरी शेवाळ- सरगॅसम, लॅमनेशिया.
प्रश्न 15. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे ?
1. मधूमेह
2. अस्थमा
3. कॅन्सर
4. गोवर ✔️
स्पष्टीकरण : गोवर हा संसर्गजन्य रोग आहे.
गोवर हा मिक्झोवायरस विषामुळे होतो. हवे मार्फत तसेच संपर्काद्वारे गोवर होतो उपचार त्रिगुणी लस.
असंसर्गजन्य रोग – अस्थमा, मधुमेह, कर्करोग.
प्रश्न 16. न्यूरोलॉजी हि विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे?
1. हाडांचा अभ्यास
2. दातांचा अभ्यास
3. चेतासंस्थेचा अभ्यास ✔️
4. प्रसुती शास्त्राचा अभ्यास
स्पष्टीकरण : न्यूरोलॉजी -चेतासंस्थेचा अभ्यास
अस्टेलॉजी -हाडांचा अभ्यास
अँटोलॉजी- दातांचा अभ्यास
गायनॅकॉलॉजी – प्रसुतीशाखाचा अभ्यास
प्रश्न 17. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
1. न्यूटन
2. डार्विन
3. गॅलेलियो
4. आईन्स्टाईन✔️
स्पष्टीकरण : ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आईन्स्टाईन यांनी मांडला.
न्यूटन -गुरुत्वाकर्षण
गॅलेलियो- थर्मामीटर
डार्विन -निसर्ग निवडीचा सिद्धांत.
प्रश्न 18. विद्युत जनित्रांमध्ये ऊर्जा रूपांतरनाचा कोणता सिद्धांत आहे?
1. रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर
2. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर ✔️
3. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर
4. प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर
स्पष्टीकरण : विद्युत जनित्रांमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत.
विद्युत घट – रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत.
विद्युत मोटर- विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत.
प्रश्न 19. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे?
1. मुंबई
2. दिल्ली
3. पंतनगर
4. पुणे ✔️
स्पष्टीकरण : स्थापना :-1950 सरकारी संशोधन संस्था
प्रश्न 20. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे?
1. तांबे व जस्त ✔️
2. तांबे व कथील
3. तांबे, जस्त व कथील
4. लोह व तांबे
स्पष्टीकरण : पितळ हे संमिश्र तांबे +जस्त या धातूचे बनलेले आहे.
जर्मन सिल्व्हर – तांबे+ जस्त+ निकेल.
ब्राँझ – तांबे+ कथिल (ब्राँझ).
प्रश्न 21. वाक्याचा प्रकार ओळखा ? जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल.
1. मिश्र वाक्य ✔️
2. संयुक्त वाक्य
3. केवल वाक्य
4. उद्गारार्थी वाक्य
स्पष्टीकरण : मेहनत करेल तोच यशस्वी होईल हे मिश्र वाक्य आहे.
संकेतबोधक गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय- जर तर, जरी – मी, जो – तो या सारखी वाक्य.
प्रश्न 22. शब्दाचा समास ओळखा? चक्रपाणी
1. कर्मधारय समास
2. दिगू समास
3. समाहार समास
4. बहुव्रीही समास ✔️
स्पष्टीकरण : चक्रपाणी- बहुव्रीही समाज
बहुव्रीही समासाची इतर उदाहरणे-
पद्मनाभ- पद्म आहे नाभित ज्याच्या तो (विष्णू). जितेंद्रिय जित (जिंकलेली आहे इंद्रिय ज्याने तो मारुती)
प्रश्न 23. खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा?
1. सचिन ✔️
2. लेख
3. पुस्तक
4. स्त्रीत्व
स्पष्टीकरण : विशेषनाम – ज्या नामात जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. उदा. सचिन, गंगा , सिंधू.
प्रश्न 24. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा?
1. केलेले उपकार जाणणारा -कृतज्ञ ✔️
2. केलेले उपकार जाणणारा – कृतघ्यन
3. केलेले उपकार विसरणारा- कृतज्ञ
4. केलेले उपकार विसरणारा- कृतार्थ
स्पष्टीकरण : केलेले उपकार जाणारा कृतज्ञ.
प्रश्न 25. खालील वाक्याचा काळ ओळखा?
‘मी रस्त्याने जात असेल ‘
1. साधा भविष्यकाळ
2. अपूर्ण भविष्यकाळ ✔️
3. रिती भविष्यकाळ
4. पुर्ण भविष्यकाळ
Your post is very good 😊👍