Maharashtra Police Bharti 2024 Questions 11 | Police Bharti 2023 च्या मीरा भाईंदर पोलीस जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न
Maharashtra Police Bharti 2024 Questions : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती 2024 ची घोषणा झालेली आहे, आणि येत्या 2 ते 3 महिन्यात पोलीस भरती 2024 च्या सर्व जिल्ह्यांच्या परीक्षा पार पडतील. Macaish.com त्याच अनुसंघाने येणार्या पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे 25 प्रश्नोत्तरे तसेच प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेवून आलेलो आहोत. आणि हे सर्व 25 प्रश्नोत्तरे Police Bharti 2023 ला झालेल्या भरतीच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अधिक अधिक सराव व्हावा म्हणून आपण दररोज अशाच प्रकारचे 25 प्रश्न घेऊन येत आहोत.
प्रश्न 1. ‘कल्पवृक्ष’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ?
1. सात
2. सहा
3. पाच
4. चार
उत्तर : 2. सहा
स्पष्टीकरण : कल्पवृक्ष या शब्दांमध्ये एकूण सहा व्यंजने आहेत.
प्रश्न 2. ‘अद्री’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
1. पृथ्वी
2. गिरिधर
3. शहर
4. पर्वत
उत्तर : 4. पर्वत
स्पष्टीकरण : अद्री- पर्वत, अचल ,जग ,तुंग, भुधर.
पृथ्वी -धरणी ,अवनी ,मही ,क्षया ,धरा.
शहर -नगर ,पुरी ,पलन ,पल्ली ,पट्टण.
प्रश्न 3. ‘द्वीपकल्प’ या शब्दाचा अर्थ असलेल्या खालील योग्य पर्याय निवडा.
1. ज्याच्या तीन बाजूंना पाणी आहे असा प्रदेश.
2. दोन नद्यांमधील प्रदेश.
3. चार ही बाजूंना पाणी असलेले.
4. बोटी थांबण्याचे व सुटण्याचे ठिकाण.
उत्तर : 1. ज्याच्या तीन बाजूंना पाणी आहे असा प्रदेश.
स्पष्टीकरण : द्वीपकल्प- ज्याच्या तीन बाजूंना पाणी आहे असा प्रदेश.
बेट – जमिनीचा असा भाग ज्याच्या चारही दिशा पाण्याने वेढलेल्या आहेत.
प्रश्न 4. निळा लिटमस आम्लरीधर्मी द्रावणात बुडवला असता त्यांच्या रंगात कोणता फरक पडेल ?
1. तांबडा होईल
2. निळाच राहील
3. गुलाबी होईल
4. रंगहीन होईल
उत्तर : 2. निळाच राहील
स्पष्टीकरण : आम्लारी द्रावणात निळा लिटमस बुडवला असता तो निळाच राहील आणि जर लाल लिटमस बुडला तर तो निळा होईल.
प्रश्न 5. मानवी रक्ताचा सामू ………. इतका असतो.
1. 7.4
2. 7.5
3. 6.4
4. 6.5
उत्तर : 1. 7.4
स्पष्टीकरण : मानवी रक्ताचा साधारण PH हा 7.35 ते 7.45 असतो म्हणजे अल्कली असतो.
(येथे 7.55 ते 7.45 हे 7.4 च्या जवळपास आहेत म्हणून हा 7.4 हा ऑप्शन निवडला आहे).
प्रश्न 6. खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे ?
1. हिरा
2. कार्बन
3. बोरॉन
4. ग्राफाईट
उत्तर : 4. ग्राफाईट
स्पष्टीकरण : अधातू हे विद्युत वहन करीत नाहीत, परंतु ग्राफाईट हा त्याला अपवाद आहे .ग्रॅफाइट हा अधातू विजेचे उत्तम सुवाहक आहे.
प्रश्न 7. मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत ?
1. सेंद्रिय संयुगे
2. असेंद्रिय संयुगे
3. जटील संयुगे
4. यापैकी नाही
उत्तर : 2. असेंद्रिय संयुगे
स्पष्टीकरण : खनिजांपासून मिळणारी संयुगे ही असेंद्रिय किंवा अजैविक संयुगे असतात उदा. मीठ ,सोडा ,चुनखडी.
प्रश्न 8. जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे ?
1. डेंग्यू
2. स्वाईन फ्लू
3. रेबीज
4. हृदयविकार
उत्तर : 3. रेबीज
स्पष्टीकरण : जलद्वेष हे रेबीज रोगाचे लक्षण . विषाणू- habdovirus
कुत्रा ,ससा, माकड यासारखे रेबीज झालेले सस्तन प्राणी चावल्यामुळे रेबीज होतो. प्रादुर्भाव मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो.
प्रश्न 9. जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास …………… म्हणतात.
1. अनुतरंग
2. अवतरंग
3. तरंगलांबी
4. तरंगकाल
उत्तर : 2. अवतरंग
स्पष्टीकरण : जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात ते अवतरंग असतात उदा. प्रकाश.
दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेनुसार आणि पुढे मागे होतात ते अनुतरंग असतात उदा. ध्वनी.
प्रश्न 10. प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची सर्वात जास्त संख्या असलेला संघ कोणता ?
1. संधीपाद प्राणीसंघ
2. कंटकचर्मी प्राणी संघ
3. मृदुकाय प्राणी संघ
4. वलयी प्राणी संघ
उत्तर : 1. संधीपाद प्राणीसंघ
स्पष्टीकरण : संधीपाद प्राणीसंघ -सर्वात मोठा ,जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी तसेच प्राण्याची संख्या सर्वात जास्त असलेला संघ.
मृदुकाय प्राणीसंघ- संधीपाद नंतरचा प्राणी सृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्राणीसंघ.
प्रश्न 11. खालीलपैकी वली पर्वत कोणता ?
1. सातपुडा
2. हिमालय
3. पश्चिम घाट
4. 1 व 3
उत्तर : 2. हिमालय
स्पष्टीकरण : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत. अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत आहे.
प्रश्न 12. ‘पावसाळा सुरू झाला’. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
1. सकर्मक कर्तरी
2. सकर्मक भावे
3. अकर्मक कर्तरी
4. कर्मणी
उत्तर : 3. अकर्मक कर्तरी
स्पष्टीकरण : पावसाळा सुरू झाला या वाक्यात’ पावसाळा ‘हा कर्ता आहे .वाक्यात कर्म नाही, म्हणून हे वाक्य अकर्मक आहे.
कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो.
प्रश्न 13. खालीलपैकी शब्दांची कोणती जात अविकारी आहे.
1. सर्वनाम
2. विशेषण
3. क्रियापद
4. क्रियाविशेषण
उत्तर : 4. क्रियाविशेषण
स्पष्टीकरण : क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार ‘अविकारी’ आहेत.
अविकारीमध्ये लिंग ,वचन ,विभक्ती मुळे बदल होत नाही.
प्रश्न 14. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ……….असे म्हणतात.
1. विकरण
2. आख्यात
3. संधी
4. विभक्ती
उत्तर : 4. विभक्ती
स्पष्टीकरण : नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात ते विकार म्हणजे विभक्ती.
विभक्ती ही नेहमी प्रत्ययावरून ओळखावी.
प्रश्न 15. मुलांनी खरे बोलावे .या वाक्याचे अकरणरुप वाक्यात रूपांतर करा.
1. मुलांनी नेहमी खरे बोलावे.
2. मुले खरे बोलत असतात.
3. मुलांनी खोटे बोलू नये.
4. मुले खोटे बोलत नाहीत.
उत्तर : 3. मुलांनी खोटे बोलू नये.
स्पष्टीकरण : जेव्हा विधान नकारार्थी असते तेव्हा क्रियापदाचे रूप अकरणरूप असते. उदा. मुलांनी खोटे बोलू नये.
वाक्य अकरणरूप करताना न, ना, नये, नाही, नको, अशासारख्या शब्दांचा वापर करतात.
प्रश्न 16. ‘पर्यंत ,विना ,सक्षम, समीप’………. ही कोणती शब्दयोगी अव्यये आहेत .
1. नामसधीत
2. क्रियाविशेषणसाधित
3. संस्कृत शब्दसाधित
4. धातूसाधित
उत्तर : 3. संस्कृत शब्दसाधित
स्पष्टीकरण : संस्कृत शब्द साधित शब्दयोगी अव्यय- पर्वत ,विना, समक्ष, समीप.
नामसाधित -कडे ,मध्ये ,प्रमाणे ,पूर्वी ,अंती ,मुळे ,विषयी
धातुसाधित -करिता ,देखील ,पावेती,लागी.
प्रश्न 17. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना असे………. म्हणतात.
1. शब्दयोगी अव्यय
2. उभयान्वयी अव्यय
3. समास
4. संधी
उत्तर : 2. उभयान्वयी अव्यय
स्पष्टीकरण : दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द हे उभयान्वयी अव्यय असतात. उदा. आणि, अथवा, पण ,परंतु ,म्हणून, म्हणजे.
प्रश्न 18. विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती ?
1. चार
2. पाच
3. सहा
4. सात
उत्तर : 3. सहा
स्पष्टीकरण : विभक्तीचे मुख्य कारकार्थ सहा आहेत पुढीलप्रमाणे- कर्ता ,कर्म ,करण, संप्रदान, अपादन,अधिकरण.
🟢पोलीस भरती सराव प्रश्नसंच🟢
Police Bharti 2024 Question Set 01
Police Bharti 2024 Question Set 02
प्रश्न 19. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ?
1. संप्रदान
2. अपादान
3. अधिकरण
4. कारकार्थ नसतो
उत्तर : 3. अधिकरण
स्पष्टीकरण : सप्तमी विभक्तीचा कारकार्थ अधिकरण आहे.
वाक्यातील क्रिया कोठे व केव्हा घडली हे सांगणारे शब्द. उदा.’दररोज सकाळी मी शाळेत जातो’. या वाक्यात ” ‘सकाळी’व ‘शाळेत’हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व स्थळ दाखवितात.
प्रश्न 20. अग्रेसर, युधिष्ठिर , पंकेरूह , सरसिज ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.
1. उपपद तत्पुरुष
2. अलुक तत्पुरुष
3. नत्र तत्पुरुष
4. कृदंत तत्पुरुष
उत्तर : 2. अलुक तत्पुरुष
स्पष्टीकरण : ज्या विभक्ती -तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
उदा .अग्रेसर, युधिष्ठिर ,पंकेरूह, सरसिज.
प्रश्न 21. पेरू ,साबुदाणा, पाव हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?
1. अरबी
2. उर्दू
3. फारशी
4. पोर्तुगीज
उत्तर : 4. पोर्तुगीज
स्पष्टीकरण : पोर्तुगीज शब्द- पेरू ,साबुदाणा, पाव.
प्रश्न 22. ‘गुरुजी म्हणाले, की मुलांनी नेहमी खरे बोलावे’ या विधानातील गौणवाक्याचे कार्य कोणते ?
1. पूरक
2. समानाधिकरण
3. कर्म
4. उद्देश
उत्तर : 2. समानाधिकरण
स्पष्टीकरण : वाक्यात ‘गुरुजी म्हणाले’ हे प्रधान वाक्य आहे. मुलांनी नेहमी खरे बोलावे’ हे गौणवाक्य आहे. हे गौणवाक्य कर्माच्या जागी आले आहे.
प्रश्न 23. अत्रीच्या आश्रमी! नेले मज वाटे! माहेरची वाट! खरेखुरे! या वाक्यातील अलंकार ओळखा .
1. अनुप्रास अलंकार
2. श्लेष अलंकार
3. उत्प्रेक्षा अलंकार
4. व्यतिरेक अलंकार
उत्तर : 3. उत्प्रेक्षा अलंकार
स्पष्टीकरण : उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तूंची तुलना करतो त्यातील (उपमेय)ही जणू दुसरी वस्तूच (उपमानच) आहे अशी कल्पना करणे. उत्प्रेक्षा अलंकारातच जणू, जणूकाय, गमे ,वाटे, भासे, की यासारखे साम्यवाचक शब्द येतात.
24. महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली .
1. बीरेंद्र सराफ
2. उज्वल निकम
3. आशुतोष कुंभकोनी
4. श्रीहरी अने
उत्तर : 1. बीरेंद्र सराफ
स्पष्टीकरण : महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ आहेत.
संविधानातील कलम 165 नुसार महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात.
उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता.
प्रश्न 25. मिरा- भाईंदर ,वसई -विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली ?
1. 1 सप्टेंबर 2019
2. 1 ऑक्टोबर 2020
3. 1 नोव्हेंबर 2020
4. 1 ऑक्टोबर 2019
उत्तर : 2. 1 ऑक्टोबर 2020
स्पष्टीकरण : मिरा -भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालय स्थापना- 1 ऑक्टोबर 2020